केंद्रीय जल आयोगाच्या पथकाने केली पाडळसे धरणाची भरपावसात पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:07 PM2018-07-20T23:07:43+5:302018-07-20T23:08:33+5:30

अमळनेरकरांच्या आशा पल्लवित- जुलै अखेरपर्र्यंत मान्यता मिळणार, सकारात्मक प्रतिसाद

Central Water Commission team conducts survey of dam dam | केंद्रीय जल आयोगाच्या पथकाने केली पाडळसे धरणाची भरपावसात पाहणी

केंद्रीय जल आयोगाच्या पथकाने केली पाडळसे धरणाची भरपावसात पाहणी

Next


अमळनेर, जि.जळगाव : केंद्रीय जलआयोगाच्या पथकाने शुक्रवारी भरपावसात तब्बल पाच तास निम्न तापी प्रकल्प पाडळसेची पाहणी केली व जुलैअखेरपर्यंत प्रकल्पाला जलआयोगाची मान्यता देण्याबाबत सकारात्मकता दाखवल्याची माहिती तापी महामंडळाच्या कार्यकारी अभियंता रजनी देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दरम्यान, आमदार स्मिता वाघ यांनी आज नागपूर येथे केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जलआयोगाच्या मान्यतेबाबत होकार दर्शवून पाडळसेसाठी निधी देण्याचे मान्य केले आह.े
पाडळसे धरणासाठी सुमारे २७०० कोटी रुपयांचा निधी लागणार असून, तो केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेतून घ्यायचा असेल तर त्यासाठी टीएसी (टेक्निकल अडव्हायझरी कमिटी) ची शिफारस आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रीय जलायोगाची मान्यता आवश्यक आहे. गेल्या काही महिन्यांपासून जलायोगाच्या मान्यतेची प्रतीक्षा सुरू आहे.
२० रोजी अचानक केंद्रीय जलआयोगाचे मुख्य अभियंता सी.के. लाल दास व संचालक मित्यानंद मुखर्जी यांनी पाडळसे धरणावर भेट दिली. भरपावसात त्यांनी तब्बल पाच तास पाहणी केली आणि भूसंपादित जमीन, पाणी साठा, वापर, पिकांसाठी व पिण्यासाठी पाण्याचा होणारा फायदा, सिंचन क्षेत्र बाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पाहणीनंतर त्यांनी जुलै अखेरपर्यंत केंद्रीय जलायोगाची मान्यता देण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी कार्यकारी अभियंता रजनी देशमुख, उपविभागीय अभियंता के.एन.महाजन, अभियंता ठाकूर, शेवाळे, पाटील, भिसे आदी कर्मचारी उपस्थित होते. भेटीबाबत गुप्तता पाळण्यात आली होती.
काल तापी प्रकल्पासाठी केंद्राने बळीराजा योजनेत समावेश करून निधी दिला, पण त्यात पाडळसेचे नाव नसल्याने राष्ट्रवादी तसेच तालुक्यातील जनतेने टीका केली होती. त्यामुळे आमदार वाघ यांनी जलसंपदा मंत्री, केंद्रीय गृहमंत्री हंसराज आहिर यांच्यासमवेत नितीन गडकरी यांची भेट घेतली व निधीची मागणी केली.
त्यावेळी त्यांनी आजच पथक पाहणीला गेले असल्याचे सांगून मान्यता देणायचे आश्वासन दिले. त्यामुळे तालुक्याला पाडळसे धरणासाठी पुन्हा बळीराजा संजीवनी योजनेच्या आशा लागल्या आहेत.

Web Title: Central Water Commission team conducts survey of dam dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.