दोन भावांच्या मृत्यूचा झाला सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:16 AM2021-09-25T04:16:55+5:302021-09-25T04:16:55+5:30

फोटो पाडसळे ता. यावल : मृत्यू आणि मानवी जीवनाचं नातं अतिशय गहन आहे. आपल्या जीवन प्रवासात मृत्यूच्या सोहोळ्याला ...

Ceremony of death of two brothers | दोन भावांच्या मृत्यूचा झाला सोहळा

दोन भावांच्या मृत्यूचा झाला सोहळा

Next

फोटो

पाडसळे ता. यावल : मृत्यू आणि मानवी जीवनाचं नातं अतिशय गहन आहे. आपल्या जीवन प्रवासात मृत्यूच्या सोहोळ्याला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन भावांचे काही तासांच्या अंतराने निधन झाले आणि दोघांची एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली...

मृत्यूचा हा सोहळाच बामणोदकरांनी शुक्रवारी अनुभवला.

बामणोद येथील सेवानिवृत्त शिक्षक जनार्दन वामन नेहेते (८०) यांचे गुरुवार रात्री ११.४५ वाजता निधन झाले. सकाळीच अंत्यविधी करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. यानंतर शुक्रवारी सकाळी अंत्ययात्रेची तयारी सुरु असतानाच जर्नादन यांचे लहान बंधू चिंतामण वामन नेहेते (७२) यांचे सकाळी ७ वाजता शेवटचा श्वास घेतला. यामुळे नेहते परिवारावर आणखी दु:खाचा डोंगर कोसळला. चिंतामण नेहते यांनी दूध डेअरी चेअरमन, फळ विक्री सोसायटीचे चेअरमन पद भूषविले होती. यानंतर दुपारी दोन्ही भावांची भजने व टाळ - मृदंगाच्या साथीने एकाचवेळी अंत्ययात्रा

काढण्यात आली आणि मृत्यूचा सोहळाच साजरा झाला. त्यांच्या मालकीच्या शेतात या भावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जनार्दन नेहेते यांचे पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे तर चिंतामण नेहेते यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली असा परिवार आहे..

Web Title: Ceremony of death of two brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.