विद्यार्थी परिषद निवडणुकांमुळे चैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 01:24 PM2019-06-27T13:24:37+5:302019-06-27T13:25:30+5:30
विद्यार्थी परिषद खुल्या निवडणुका आॅगस्ट महिन्यात होत आहेत
शैक्षणिक वर्ष २०१९-२० यापासून महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषद खुल्या निवडणुका आॅगस्ट महिन्यात होत आहेत. लोकशाहीचे बाळकडू महाविद्यालयीन जीवनापासून मिळावे, ते वाढावे आणि फलद्रुप व्हावे हा त्यामागील उद्देश १९९४ पासून बंद असणाऱ्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका २५ वर्षानंतर सुरू होत आहेत. विद्यार्थी वर्गात यामुळे उत्साह आणि चैतन्य आहे. लोकशाहीचे बिजारोपण होण्यासाठी निवडणुका निश्चित महत्वाच्या आहेत. शासनाने त्यासाठी उचलेले पाऊल कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. महाविद्यालय विद्यार्थी परिषद व विद्यापीठ कॅम्पस विद्यार्थी परिषद हा पहिला टप्पा असणार आहे. या टप्प्यात अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी व मागासवर्गीय प्रतिनिधी असे चार आणि वर्ग प्रतिनिधी असे एकूण ५ मते देण्याचा अधिकार मतदार विद्यार्थ्याला असेल. पहिले चार निवडलेले प्रतिनिधीची सर्व महाविद्यालयांची मतदार यांनी विद्यापीठ स्तरावर तयार होऊन त्यातून अध्यक्ष,सचिव, महिला प्रतिनिधी व मागासवर्गीय प्रतिनिधी यांची निवडणूक घेऊन विद्यापीठ विद्यार्थी परिषद गठीत होईल. निवडणूक लढविण्यासाठी पात्रता - पूर्णवेळ नियमित विद्यार्थी असावा, संपूर्ण विषय उत्तीर्ण असावा, एटीकेटी नसावी, एकाच वर्गात पुन:प्रवेश नसावा, वयाच्या २५ वर्ष (कमाल वयोगमर्यादा). आचारसंहिता- पॅनल तयार करता येणार नाही, धर्म, जात, संघटना व कोणत्याही व्यक्तीचे चिन्ह, प्रतिमा, छायाचित्र वापरता येणार नाही. वर्ग प्रतिनिधीसाठी १०० रु. व अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, मागास प्रतिनिधीसाठी ५००० रुपये एवढा खर्च असेल.
- प्रा.सत्यजित साळवे, संचालक, विद्यार्थी विकास.