रुग्णसेवेसाठी आता चक्करबर्डीची वारी!
By Admin | Published: March 14, 2016 12:22 AM2016-03-14T00:22:35+5:302016-03-14T00:22:35+5:30
धुळे : शहरातील जिल्हा सवरेपचार रुग्णालयाचे स्थलांतर चक्करबर्डी येथील नवीन इमारतीत सुरू असून आजपासून रुग्णालय नवीन इमारतीत सुरू होणार आह़े
धुळे : शहरातील जिल्हा सवरेपचार रुग्णालयाचे स्थलांतर चक्करबर्डी येथील नवीन इमारतीत सुरू असून आजपासून रुग्णालय नवीन इमारतीत सुरू होणार आह़े त्यानुषंगाने नवीन इमारतीत मोजकी तयारी झाली असून व्यवस्थाही बेताचीच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आल़े ब:याच वर्षाच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा सवरेपचार रुग्णालयाचे स्थलांतर चक्करबर्डी येथील नूतन इमारतीत होत आह़े 10 ते 12 खासगी वाहनांसह सार्वजनिक बांधकाम विभाग व रुग्णालय प्रशासनाच्या रुग्णवाहिकांमधून साहित्याची वाहतूक ेअजून सुरू आह़े नूतन इमारतीत अत्याधुनिक आयसीयू तसेच प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे तयार करण्यात आला आह़े अर्थात रुग्णालय स्थलांतरित झाल्यानंतर सर्व सुविधा उपलब्ध होण्यास साधारण महिनाभराचा कालावधी लागणार आह़े इमारतीच्या आवारात अल्पोपाहार केंद्रदेखील उपलब्ध असणार आह़े त्याचप्रमाणे नवीन इमारत तीन मजली असून रुग्णांसाठी लिफ्टची व्यवस्थादेखील उपलब्ध करून देण्यात आली आह़े दोन लिफ्ट रुग्णांना सुविधा पुरविणार आह़े अपघात विभागाचे उद्घाटन जिल्हा सवरेपचार रुग्णालयातील अपघात विभागासह प्रसूती, बर्न विभाग व अन्य विभाग नवीन इमारतीत सुरू केले जाणार असून सोमवारी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ सतीशकुमार गुप्ता यांच्या हस्ते छोटेखानी उद्घाटन कार्यक्रम होणार आह़े तसेच दोन महिलांची प्रसूती व अपघातग्रस्तांवरील शस्त्रक्रियांनी या विभागांचे कामकाज सुरू केले जाणार असल्याची माहिती रुग्णालय अधीक्षक डॉ़ अनंत बोर्डे यांनी दिली़ वाहतुकीचा प्रश्न शहरातून चक्करबर्डी येथील रुग्णालयात जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था तोकडी पडण्याची शक्यता आह़े दोन 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांसह 1 रुग्णालयाची रुग्णवाहिकादेखील वाहतुकीची सुविधा देणार आह़े ग्रामीण भागातील रुग्णांनी चक्करबर्डीलाच यावे ग्रामीण भागातील नागरिकांनी यापुढे रुग्णांना शहरात न आणता थेट चक्करबर्डीलाच आणावे, जेणेकरून रुग्णांवर उपचार करण्यास विलंब होणार नाही, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आह़े ग्रामीण भागातील बहूतांश रुग्ण 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांनी येत असल्यामुळे त्यांना यापुढे चक्करबर्डीला नेण्यात येणार आह़े ऐन उन्हाळ्यात जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर झाल्यामुळे रुग्णांसह नातेवाइकांचे हाल होणार आहेत़