चाळीसगावी वादळाचा तडाखा झाडांच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 22:15 IST2021-05-17T22:12:33+5:302021-05-17T22:15:31+5:30
रविवारी व सोमवारी झाडांना जोरदार वाऱ्यासह वादळाचा तडाखा चाळीसगाव परिसराला बसला.

चाळीसगावी वादळाचा तडाखा झाडांच्या मुळावर
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : रविवारी व सोमवारी झाडांना जोरदार वाऱ्यासह वादळाचा तडाखा बसला. शहर व ग्रामीण भागातही काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. इतर नुकसान मात्र झाल्याची नोंद नाही.
रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी तडाख्याने काही ठिकाणी झाडे पडली. येथील करगाव रोडवरील डॉ. राऊळ रुग्णालयासमोरील झाड उन्मळून पडले. यामुळे काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला. न. पा.च्या पथकाने हे पडलेले झाड नंतर हटविले.
सोमवारीदेखील सकाळी आलेल्या वादळी - वाऱ्यात शेजवळकर नगरातील लिंबाचे जुने मोठे झाड उन्मळून पडले. यामुळे विजेचे दोन खांब वाकल्याने या भागातील वीजपुरवठा काहीकाळ खंडित झाला. या झाडाचे लाकूड स्मशानभूमीत जाळण्यासाठी देण्यात येणार असल्याची माहिती परिसरातील रहिवाशांनी दिली.