चाळीसगावला नारीशक्तीचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 04:00 PM2019-03-01T16:00:21+5:302019-03-01T16:01:25+5:30
युगंधरा फाउंडेशन, देवरे फाउंडेशन, स्त्रीरोग संघटना आणि रोटरी क्लब आॅफ चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त नारी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
चाळीसगाव, जि.जळगाव : युगंधरा फाउंडेशन, देवरे फाउंडेशन, स्त्रीरोग संघटना आणि रोटरी क्लब आॅफ चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त नारी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
३ रोजी 'चलाला धावू या' स्पर्धा व आठ रोजी रणरागिणी पुरस्काराने विविध क्षेत्रातील ११ महिलांचा रणरागिणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. ४ ते ७ मार्च या कालावधीत तालुक्यातील टाकळी प्र.दे., शिरसगाव, पाटणा आणि चितेगाव या ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य, स्वावलंबन, संरक्षण व कायदेविषयक माहीती स्पष्ट व्हावी म्हणून अनेकविध व्याख्यान व शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
चला धावू या मॅरेथॉन स्पर्धेचे सलग दुसरे वर्ष असून सकाळी सहा वाजता स्पर्धेस सुरुवात होणार आहे. न्यायाधीश अनिता गिरडकर व महाराष्ट्र स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ.रोहिणी देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग पोलिस कवायत मैदान, शिवाजी चौक, भडगाव रोड, सिग्नल पॉईंट मार्गे पोलिस कवायत मैदानावर रॅलीची सांगता होणार आहे.
११ रणरागिणी
सिस्टर लिजी, सरला साळुंखे, राधा पाडवी, सीमा पाटील, दर्शना पवार, कविता बागूल, कावेरी पाटील, कुसुमावती पाटील, नीलिमा हिवराळे, स्नेहा सोनवणे, प्रा.साधना निकम यांना रणरागिणी पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
यावेळी प्रा.सरोज जगताप (निफाड) आणि विजयालक्ष्मी आहेर (मालेगाव) यांची प्रमुख उपस्थिती राहील. नारी सप्ताहाच्या कार्यक्रमाचा समारोप प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांच्या हस्ते होणार आहे.