चाळीसगावात एकाच दिवशी आढळले ७९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 21:41 IST2020-08-28T21:41:21+5:302020-08-28T21:41:29+5:30
नागरिकांमध्ये चिंता

चाळीसगावात एकाच दिवशी आढळले ७९ रुग्ण
चाळीसगाव: तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार ७९ नवे कोरोनो पॅझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या एकूण १५८७ इतकी झाली आहे. एकाच दिवशी इतकी संख्या प्रथमच आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढतच असल्याने तालुक्यात सर्वत्र चिंता वाढली आहे.