चाळीसगावला आजी-माजी नगरसेवक पुत्रांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 09:38 PM2020-05-28T21:38:12+5:302020-05-28T21:38:18+5:30
मागील भांडणाचे कारण : परस्पर विरोधी गुन्हा दाखल
चाळीसगाव : मागील भांडणाच्या कारणावरून आजी-माजी नगरसेवकांच्या पुत्रांमधील वादाची ठिणगी पुन्हा उफाळून आल्याने दोन्हीही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हा २७ रोजी रात्री उशिरा झाला आहे. या हाणामारीत आजी-माजी नगरसेवक, त्यांचे पुत्र व अन्य जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून २८ रोजी नगरसेवक आण्णा कोळी यांचे दोन्ही पुत्र यांचेसह पाच जणांना अटक केली आहे.
याप्रकरणी २८ रोजी नगरसेवक आण्णा कोळी यांचे पुत्र सिद्धार्थ कोळी,सौरभ कोळी यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पहिल्या घटनेत माजी नगरसेवक रमेश विक्रम चव्हाण यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नगरसेवक आण्णा चिंधा कोळी, सिद्धार्थ कोळी, सौरभ कोळी, वसंत कोळी, अक्षय कुमावत, लखन कुमावत, वैभव रोकडे, राहुल कोळी यांनी २७ रोजी दुपारी अडीच वाजता रमेश चव्हाण यांच्या रामवाडी येथील घरासमोर मागील भांडणाच्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ व दगडफेक केली तर सिद्धार्थ कोळी व सौरभ कोळी यांनी तलवार हवेत मिरवून दमबाजी करून शिवीगाळ केली. या तक्रारीवरून पोलीसात दंगलीचा गुन्हा केला आहे. तपास सहाय्यक निरीक्षक आशिष रोही करीत आहे. तर नगरसेवक आण्णा कोळी यांच्या गटाकडून जयश्री कैलास मोरे रा.चाळीसगाव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, २७ रोजी दुपारी दीड वाजता रमेश चव्हाण, त्यांचे पुत्र मोहन चव्हाण,पवन चव्हाण, रोहन चव्हाण यांचेसह चार ते पाच जणांनी घाटरोडवरील कोळी महा संघाच्या कार्यालयाचे शटर तोडून अनधिकृतरित्या प्रवेश करून टेबल, खुर्च्या व समानांची तोडफोड केल्याची तक्रार दिली. सर्वांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्याप्रमाणे व दंगलीचा गुन्हा दाखल आहे. तपास पोलीस उपअधीक्षक कैलास गावडे करीत आहे.