चाळीसगाव वनक्षेत्रात बिबट्याला मारले, पण दहशत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:35 PM2017-12-12T15:35:07+5:302017-12-12T15:40:10+5:30

वरखेडे परिसरात शेतात आले की डोळ्यासमोर उभा राहतो बिबट्या...

In Chalisgaon forest area, the leopard killed, but panic | चाळीसगाव वनक्षेत्रात बिबट्याला मारले, पण दहशत कायम

चाळीसगाव वनक्षेत्रात बिबट्याला मारले, पण दहशत कायम

Next
ठळक मुद्देखडका शिवारात शनिवारी रात्री बिबट्याला केले ठारठार केलेल्या बिबट्याला दाखवले नाही म्हणून सरपंचांनी व्यक्त केली नाराजीवाडे गावालगत हिस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात बकरी ठार

आॅनलाईन लोकमत
वरखेडे, ता.चाळीसगाव,दि.१२ : गेल्या अनेक महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा आणि सात जणांचे बळी घेणारा बिबट्या ठार झाला आहे. पण वरखेडसह परिसरात भीती कायम आहे. शेतात आल्यानंतर शेतकरी आणि मजुरांना बिबट्याची भीती मनात कायम आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मृत्यूचे तांडव करत असलेला बिबट्या यमसदनी पोहचला तरी अजूनही लोकांना खरे वाटत नाही.
हैदराबाद येथून खास पाचारण करण्यात आलेला शॉर्प शूृटर नवाब शहाफत अली खान व त्यांचा मुलगा नक्षबंधू यांनी वरखेडे खुर्द परिसरातील खडका शिवारात शनिवारी रात्री बिबट्याला ठार केले होते. या नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत चार महिला व तीन बालकांसह सात जणांचे बळी घेतले आहेत.
सरपंचांची तक्रार
वरखेडे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच भिवसन जगताप यांनी ठार केलेल्या बिबट्याला दाखवले नाही म्हणून नाराजी व्यक्त केलीे. गावाचा प्रमुख या नात्याने मला मृत बिबट्या पाहण्याचा पूर्ण हक्क होता, मात्र वनविभागाने मला कोणतीच कल्पना न देता बिबट्यास चाळीसगावकडे नेल्याची त्यांची तक्रार आहे.
भडगाव वाडे गावालगतच्या वस्तीत संदीप देवराम पाटील यांच्या घरासमोर बांधलेल्या बकरीचा हिंस्त्र प्राण्याने फडशा पाडला. ही घटना १० रोजी मध्यरात्रीनंतर घडली.
हा तडस की अन्य हिंस्त्र प्राणी याबाबत नागरिकांत चर्चा आहे. यामुळे पशुमालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने घटनास्थळी तत्काळ भेट देऊन पाहणी करावी, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा व नागरिकांमधील भीती दूर करावी, अशी मागणीही होत आहे. यापूर्वी वाडे परिसरात दोन ते तीन वेळा हिंस्त्र प्राण्याने दर्शन दिल्याची चर्चा आहे.

Web Title: In Chalisgaon forest area, the leopard killed, but panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.