उल्लेखनीय काम करणा-यांचा चाळीसगावला गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 03:02 PM2021-01-15T15:02:57+5:302021-01-15T15:05:05+5:30
उल्लेखनीय काम करणा-यांचा चाळीसगावला गौरव करण्यात आला.
चाळीसगाव : वेगळ्या वाटेने जाऊन केलेली कामे समाजाला अधिक पुढे नेतात. अशी कामे करणा-या व्यक्ती मग इतरांसाठी आदर्श होऊन जातात. त्यांचा गौरव हा सगळ्यांसाठी प्रेरणेची वात प्रज्वलित करण्यासारखेच असते, असे संबोधन संभाजी सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांनी येथे केले. राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या व्यक्तींच्या गौरव सोहळ्यात प्रास्ताविक करताना त्यांनी उपक्रमाची भूमिका विशद केली. व्यासपीठावर उमंग महिला परिवाराच्या प्रमुख संपदा पाटील, डॉ.सुनील राजपूत, अॕड.आरती पूर्णपात्रे, अॕड. आशा शिरसाट, नगरसेविका विजया पवार, सविता राजपूत, संगीता गवळी, सोनल साळुंखे, सविता कुमावत, साधना निकम आदी उपस्थित होते. सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोरपडे, सुधीर पाटील, अरुण पाटील, योगेश पाटील, बबन पवार, विजय गवळी, योगेश भोकरे, अजय वाणी, सचिन पवार, वकील संघाचे अध्यक्ष अॕड.प्रमोद एरंडे, अॕड. सुलभा पवार, भुरन घुले, प्रवीण गवळी, महेंद्र बिराडे, दिनेश मोरे, खुशाल पाटील, संजय सोनवणे, मिनवती जगताप अनिता शर्मा, सुचित्रा राजपूत, रमेश पोतदार आदी उपस्थित होते. ग्रीष्मा पाटील, गायत्री चौधरी यांनी गीतगायन तर सूत्रसंचालन शालिग्राम निकम यांनी केले. सांगता प्रकाश चौधरी यांच्या राष्ट्रगीत बासरीवादनाने झाली. अविनाश काकडे, सुनील पाटील, गिरीश पाटील, लक्ष्मण बनकर, सुरेश पाटील, दिवाकर महाले, ज्ञानेश्वर पगारे, विजय देशमुख, भय्यासाहेब देशमुख, बंटी पाटील, सनी मराठे, अमर भोई, लक्ष्मण बनकर, कृष्णा पाटील, आबा सैंदाणे, संदीप जाधव, सचिन जाधव, यश सूर्यवंशी, कुणाल आराक, रोहित वाणी, सुनील ठाकूर, राकेश पवार आदींनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. यांचा झाला गौरव कोरोना काळात वैद्यकीय सेवा देणारे डॉ.मंगेश वाडेकर, डॉ.पल्लवी वाडेकर, शहरात हजारो वृक्षाची लागवड करून वृक्ष संवर्धन चळवळ जोपासणारे वर्धमान धाडीवाल, स्वच्छता मोहीम राबविणारे विजय शर्मा, हजारो युवकांच्या साथीने गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करणारे पंकज पाटील, न डगमगता वैद्यकीय सेवेत शवविच्छेदन करणारी युवती सपना चावरे यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मानपत्राचे शब्दांकन कवी व साहित्यिक जिजाबराव वाघ यांनी केले होते.