चाळीसगावला ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व, खेडगाव येथे जि.प.च्या माजी सदस्यांचे पॅनल पराभूत 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 04:22 PM2023-11-06T16:22:23+5:302023-11-06T16:22:23+5:30

साळुंखे यांच्या पॅनलला ११ पैकी फक्त २ जागा मिळाल्या. निकाल धक्कादायक लागले असून मातब्बरांना धक्का बसला आहे.

Chalisgaon Gram Panchayat Election BJP dominance Khedgaon panel of ex-members of Z.P. defeated | चाळीसगावला ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व, खेडगाव येथे जि.प.च्या माजी सदस्यांचे पॅनल पराभूत 

चाळीसगावला ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व, खेडगाव येथे जि.प.च्या माजी सदस्यांचे पॅनल पराभूत 

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील ११ ग्रामपंचायत व एका पोटनिवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत सर्व ठिकाणी झेंडा फडकवला आहे. तालुक्याचे लक्ष लागलेल्या खेडगाव ग्रा.पं.चा गड येथे अनिवाश जगन्नाथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राखला आहे. इथे राष्ट्रवादीचे  जि.प. चे माजी सदस्य शशिकांत साळुंखे यांच्या पॕनलचा पराभव झाला आहे. साळुंखे यांच्या पॅनलला ११ पैकी फक्त २ जागा मिळाल्या. निकाल धक्कादायक लागले असून मातब्बरांना धक्का बसला आहे.
 
नवख्यांसह महिलांनी देखील मतदारांना संधी दिली आहे.  पातोंडा येथे निवडणुक यापूर्वीच बिनविरोध झाली असून ही ग्रा.पं.भाजपाकडेच आहे. विजयी उमेदवारांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात विजयोत्सव साजरा केला. यावेळी शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण या उपस्थित होत्या. 

भाजपचे विजयी झालेले लोकनियुक्त सरपंच असेः खेडगाव - उषाबाई विनायक मरसाळे, माळशेवगे - सुरेश युवराज पाटील, खेरडे - करिश्मा वाल्मिक निकम, रामनगर - दिनेश प्रकाश जाधव, न्हावे - ढोमणे - वासुदेव वाल्मिक खैरनार, वडाळा - वडाळी - अनिल युवराज पाटील, दहिवद - पंकज शिवाजी पवार, हिरापूर - विनोद आनंदाराव पाटील, सेवानगर - जवाहरलाल प्रल्हाद चव्हाण, पिंप्री बु.प्र.चा. - राजेंद्र नारायण मोरे, ओझर - प्रणाली राहुल पवार यांचा समावेश आहे.
 

Web Title: Chalisgaon Gram Panchayat Election BJP dominance Khedgaon panel of ex-members of Z.P. defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.