चाळीसगावला ६०० जनसेवकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:50 PM2019-01-09T12:50:16+5:302019-01-09T12:50:39+5:30
महिला स्मृतीचिन्हासह साडी देऊन सन्मानित
चाळीसगाव तालुक्यातील गेल्या ५० वर्षात विविध संस्था, सहकार, शिक्षण व राजकारणात योगदान देणा-या ६००हून अधिक लोकप्रतिनिधींचा 'जनसेवक' गौरव सोहळा बुधवारी दुपारी बारा वाजता राजपुत लोकमंगल कार्यालयात सुरु झाला. कै. लोकनेते अनिलदादा देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सन्मान सोहळा होत आहे. सोहळ्यासाठी ग्रामीण व शहरी भागातून मोठी उपस्थिती लाभली आहे.
व्यासपीठावर विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, ज्येष्ठ नेते उदेसिंह पवार, माजी खासदार वसंतराव मोरे, आमदार डॉ. सतीष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, अॕड, ईश्वर जाधव, माजी जि.प.सदस्य सुभाष चव्हाण, माजी नगराध्यक्षा पद्मजा देशमुख, वैशाली मंगेश पाटील, अनिता दिलीप चौधरी आदी उपस्थित आहेत.
सुरुवातीला दीपप्रज्वलन व प्रतिमापुजन झाले. स्मृतीचिन्ह, शाल तर महिलांना स्मृतीचिन्हासह साडी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. यशस्वीतेसाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जि.प.सदस्य शशिकांत साळुंखे, भूषण पाटील, अतुल देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शाम देशमुख, पं.स.चे राष्ट्रवादीचे गटनेते अजय पाटील, भगवान पाटील, प्रशांत देशमुख, मिलिंद शेलार, जयसिंग भोसले आदी परिश्रम घेत आहे.