चाळीसगाव क्षत्रिय मराठा समाज महासंघाची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 09:25 PM2019-03-04T21:25:27+5:302019-03-04T21:26:31+5:30
शिवछत्रपती क्षत्रिय मराठा समाज महासंघ चाळीसगाव शाखेची बैठक शहरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात ३ रोजी झाली. त्यात नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी गणेश पवार यांची निवड करण्यात आली.
चाळीसगाव, जि.जळगाव : शिवछत्रपती क्षत्रिय मराठा समाज महासंघ चाळीसगाव शाखेची बैठक शहरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात ३ रोजी झाली. त्यात नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी गणेश पवार यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आले. पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. झालेल्या बैठकीत सर्वानुमते शिवछत्रपती क्षत्रिय मराठा समाज महासंघाचे नूतन पदाधिकारी व सदस्यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, उपाध्यक्षपदी प्रा.सुनील जाधव, प्रभाकर फाटे, संजय नवले तर कार्याध्यक्षपदी किरण पवार, खजिनदार बाळासाहेब पवार, सचिव किरण रामदास पवार, सहसचिव अमित नागणे तर सदस्य म्हणून प्रकाश जाधव, मुकुंद पवार, दीपक नागणे, वंसत देठे, हर्षल इंगोले, योगेश गव्हाणे, सागर यादव, ज्योतीराव शिंदे, रमेश पवार, चंद्रशेखर गायकवाड, भूषण पवार, राकेश गायकवाड यांची निवड जाहीर करण्यात आली तर सल्लागार म्हणून जगदीश जाधव, सुरेश देवाजी पवार, मधुकर नागणे, भिकन गायकवाड, भीमराव पवार, लहु बाबर, रामचंद्र पवार, बबन नागणे, भगवान पवार, मुरलीधर कोथमिरे, प्रताप सपकाळ, धर्मा पवार यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी समाजाच्या प्रगतीसाठी बैठकीत विचारविनिमय करण्यात येवून त्यावर अमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमास भिकन पवार, रमेश नागणे, बबन पवार, श्रीराम देठे, सतीश पवार, अनिल पवार, विठ्ठल पवार, शिरीष पवार, विजय पवार, रवींद्र नागणे, अजय पवार, दत्तू पवार, दिलीप पवार, रमेश पवार, मारुती पवार, मिलिंद गायकवाड, नाना पवार, विश्वास पवार, बाळू पवार, प्रवीण गायकवाड, शिवाजी पवार, तुळशीराम पवार, चंद्रकांत नागणे, अमोल पवार, रवींद्र गायकवाड, ललित पवार, विनोद पवार, विशाल पवार, रामा पवार, पवन पवार, प्रज्वल पवार, मंगेश देठे, निखिल पवार, अमोल पाटील, मंगेश पवार, गणेश पवार, अक्षय पवार, कार्तिक पवार आदी उपस्थित होते.