चाळीसगाव ‘महानगरी,’ तर पाचोऱ्यात ‘सचखंड’ला थांबा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 05:33 PM2019-01-16T17:33:22+5:302019-01-16T17:35:04+5:30
चाळीसगाव व पाचोरा येथील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पाचोरा येथे सचखंड, तर चाळीसगाव रेल्वे स्थानकावर महानगरीला थांबा देण्यात रेल्वे मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे.
चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव व पाचोरा येथील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पाचोरा येथे सचखंड, तर चाळीसगाव रेल्वे स्थानकावर महानगरीला थांबा देण्यात रेल्वे मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. महिनानाअखेर दोन्ही गाड्या थांबायला लागतील, असे खासदार ए.टी.पाटील यांनी सांगितले. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
चाळीसगाव व पाचोरा रेल्व स्थानकावर गेल्या दोन-तीन वर्षात अनेक महत्वाच्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांंना थांबे मिळाले आहे. आता त्यात आणखी भर पडली असून, आता पाचोरा रेल्वे स्टेशनला सचखंड एक्सप्रेस चा तर चाळीसगाव ला महानगरी चा थांबा मिळणार आहे. खासदार पाटील यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन प्रवांशाची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी या गाड्यांना थांबा देण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार रेल्वे विभागाने या गाड्यांच्या थांब्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. दोन्ही गाड्यांना महिनाअखेरपर्यंत थांबा मिळणार आहे. दरम्यान, दोन्ही तालुक्यातील रेल्वे प्रवाशी संघटनाची या गाड्याना थांबा मिळण्याची मागणी होती.
'राजधानी'ला जळगाव थांबा?
नव्याने सुरू होणाºया मुंबई ते नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसला जळगावला थांबा मिळण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मागणीनुसार राजधानी एक्सप्रेसला जळगाव थांब्याला हिरवा झेंडा मिळवण्याची चिन्हे आहेत. राजधानी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी, आग्रा निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला थांबा मिळण्याचे संकेत आहे. त्यामुळे दिल्लीला व उत्तर भारतात जाणे सोयीचे होणार आहे.
प्रवाशांच्या मागणीनुसार चाळीसगावला महानगरी व पाचोरा ला सचखंड एक्सप्रेसचा थांबा रेल्वे विभागाने मान्य केला आहे. याचे मोठे समाधान आहे. तर नव्याने सुरू होणाºया राजधानी एक्स्प्रेसला ही जळगाव येथे थांब्याची मागणी केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
-ए.टी.पाटील खासदार