चाळीसगाव पालिकेचा शिलकी अर्थसंकल्पावर विरोधकांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:42 PM2018-02-28T12:42:51+5:302018-02-28T12:42:51+5:30

मुख्याधिका-यांना दिले निवेदन

Chalisgaon Municipal Corporation's Budget | चाळीसगाव पालिकेचा शिलकी अर्थसंकल्पावर विरोधकांचा आक्षेप

चाळीसगाव पालिकेचा शिलकी अर्थसंकल्पावर विरोधकांचा आक्षेप

googlenewsNext
ठळक मुद्देचर्चेविनाच केला मंजूरसत्ताधारी म्हणतात सर्व योग्यच

आॅनलाइन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. २८ - चाळीसगाव नगरपालिकेचा ३ कोटी ३९ लाख ७६ हजार ८६७ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मंगळवारी सभागृहात नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी सादर केला. सत्ताधा-यांनी बहुमताने मंजुरही केला. विरोधी शविआच्या सदस्यांनी मात्र चर्चेविनाच बहुमताच्या जोरावर अर्थसंकल्प मंजुर केल्याचा आक्षेप घेतला. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना याविषयीचे निवेदनही दिले. उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, शविआचे गटनेते राजीव देशमुख, भाजपाचे गटनेते राजेंद्र चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
१८२ कोटी २४ लाख १६ हजार ४६६ रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यात १७९ कोटी २४ लाख ३९ हजार ९९९ रुपये खर्च होणार असून ३ कोटी ३९ लाख ७६ हजार ८६७ शिल्लक राहणार आहेत. अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचविण्यात आली नाही.
विरोधकांचे आक्षेप
अर्थसंकल्पाच्या आकडेवारीत चुका आहेत. त्याबाबत मुख्याधिका-यांनी समर्पक उत्तर दिले नाही. २०१४ - १५च्या अर्थसंकल्पात प्रारंभिक शिलकीची आकडेवारी सदोष असल्याने २०१८च्या अर्थसंकल्पावर त्याचा परिणाम झाला आहे.
अर्थसंकल्प सभागृहात मांडण्याआधी तो स्थाथी समितीसमोर मांडणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. सत्ताधारी विरोधी नगरसेवकांविषयी आकस बुद्धीने वागतात. सदोष आकडेवारी लक्षात आणून दिल्यानंतर मुख्याधिका-यांनी सभागृहात माफीही मागितली.
सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर कोणतीही चर्चा न करताच अर्थसंकल्प मंजुर केला. मतदान देखील घेतले नाही. मंगळवारी घेतलेली सभा रद्द करावी. अशी मागणीही विरोधकांनी मुख्याधिका-यांना दिलेल्या निवेदनात केली. यावर सुरेश स्वार, दिपक पाटील, सूर्यकांत ठाकुर, रामचंद्र जाधव, आनंदा कोळी यांच्यासह एकुण १६ सदस्यांच्या स्वाक्षरी आहेत.
सत्ताधारी म्हणतात सर्व योग्यच
२०१४च्या अर्थसंकल्पाच्या आकडेवारीत तांत्रिक चूक होती. हे आम्ही मान्य केले. मुख्याधिका-यांनी माफी मागून विरोधकांच्या सुचना स्विकारण्याची तयारी देखील दाखवली. तथापि विरोधकांनी अडवणुकीचे धोरण घेतले.
शहरातील अंतर्गत पाणी पुरवठा करणा-या जलवाहिन्या, नदी संवर्धन, पालिकेला २०१९ मध्ये १०० वर्ष होत असल्याने शताब्दी महोत्सव साजरा करणे, भूयारी गटार, हा?कर्स झोनची निर्मिती, दलित वस्ती सुधारणा, पंतप्रधान आवास योजना यासाठी भरीव तरतूद केली आहे.
अर्थसंकल्पावर चर्चा करण्याची तयारी असतांनाही विरोधकांनी अडवणुकीचे धोरण घेतले. बहुमत असल्यानेच शिलकी अर्थसंकल्प मंजुर केला असल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी गटातील नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नितिन पाटील यांनी दिली.
लेखपालास नोटीस देणार
अर्थसंकल्पातील आकडेवारीत चुका करणारे लेखापाल चंद्रशेखर वैद्य यांना नोटीस देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सांगितले. वैद्य हे मंगळवारी अर्थसंकल्पाच्या सभेलाही गैरहजर होते. आकडेवारीत चुका करणा-या कर्मचा-यांवर कारवाई करावी. अशी मागणी सभागृहात संजय रतनसिंग पाटील, चंद्रकांत तायडे या सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी केली होती.

विरोधी सदस्यांची भूमिका समन्वयाची नव्हती. तांत्रिक चुक मान्य करुन आणि फेरबदल करण्याची तयारी दर्शविल्यानंतरही त्यांनी विरोधच केला. बहुमताने शिलकी अर्थसंकल्प मंजुर झाला आहे. सभा ही कायदेशीरच आहे. सुचना स्विकारण्याचेही आम्ही मान्य केले होते.
- आशालता चव्हाण, नगराध्यक्षा

अर्थसंकल्प हा पालिका व नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सत्ताधा-यांना आकडेवारीतील चुका लक्षात आणुन दिल्या. चचेर्ची तयारीही दाखवली. मात्र त्यांनी चर्चा न करताचं अर्थसंकल्प मंजुर केला. हे चुकीचे आहे. सत्ताधा-यांकडे बहुमत होते. त्यांनी मंजुरीसाठी मतदान का घेतले नाही ?
- राजीव देशमुख, गटनेते शविआ

Web Title: Chalisgaon Municipal Corporation's Budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.