चाळीसगाव बातमी जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:34 AM2021-09-02T04:34:10+5:302021-09-02T04:34:10+5:30

आमदार चव्हाण धावले मदतीला शहरात पुराची स्थिती समजताच आमदार मंगेश चव्हाण हे सकाळी ६ वाजताच नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेले. ...

Chalisgaon News Link | चाळीसगाव बातमी जोड

चाळीसगाव बातमी जोड

Next

आमदार चव्हाण धावले मदतीला

शहरात पुराची स्थिती समजताच आमदार मंगेश चव्हाण हे सकाळी ६ वाजताच नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेले. त्यांनी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह परिस्थिताचा आढावा घेऊन मदत कार्य तातडीने पोहोचविण्याच्या सूचना दिल्या. या वेळी त्यांच्यासोबत पालिकेचे भाजप गटनेते संजय रतनसिंग पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम आदी उपस्थित होते. त्यांच्या कार्यालयातून पूरग्रस्तांसह कन्नड घाटात अडकून पडलेल्या प्रवासी व आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलीस यांच्यासाठी जेवणासह पिण्याचे पाणी पुरविण्यात आले. चव्हाण यांनी कन्नड घाटात जाऊनही परिस्थितीचा आढावा घेतला. वर्धमान धाडीवाल मित्रमंडळानेही गरजूंना अन्नवाटप केले. हिरकणी महिला मंडळाने नुकसान झालेल्या नागरिकांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कन्नड घाटात अडकून पडलेल्या प्रवाशांना जेवण व पाणी पोहोच केले.

पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

दुपारी ४ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कन्नड घाटातील परिस्थितीची पाहणी केली. शहरातील पूरग्रस्त भागालाही त्यांनी भेट दिली.

सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी कन्नड घाट व चाळीसगावातील पूरस्थितीचा आढावा घेतला. कन्नड घाटात बचाव कार्य करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन टीमला त्यांनी सूचना दिल्या. या वेळी त्यांच्यासोबत आमदार मंगेश चव्हाण, संजय रतनसिंग पाटील, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे हेही उपस्थित होते.

दुपारी दोन वाजता माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील यांनीही कन्नड घाटातील स्थितीचा आढावा घेतला. जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, पं.स.चे सभापती अजय पाटील यांनी वाघडू, वाकडी, रोकडे आदी पूरग्रस्त गावांना भेटी देऊन नागरिकांना धीर दिला.

२४ तासांत ५४६ मिमी पाऊस, १० धरणेही ओव्हरफ्लो

मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारी तीन वाजेपर्यंत संततधार कायम ठेवल्याने गत २४ तासांत तालुक्यात ५४६ मिमी पाऊस झाला आहे. चाळीसगाव मंडळात ९२ तर तळेगाव मंडळात सर्वाधिक १४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बहाळ-४७ मिमी, मेहुणबारे-१५ मिमी, हातले-८०, शिरसगाव-७०, खडकी-९७ मिमी.

बुधवार अखेर तालुक्यात ६९० मिमी पाऊस झाला असून, सरासरी ७८ टक्के पर्जन्यमान झाले आहे. तालुक्यातील १४ मध्यम जल प्रकल्पांपैकी हातगाव-१, खडकीसीम, वाघला-१, पिंपरखेड, कुंझर-२, वाघला-२, वलठाण, राजदेहरे, कृष्णापुरी, मुंदखेडे खुर्द, कोदगाव ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.

पिंप्री उंबरहोळ, ब्राह्मणशेवगे ही धरणे अजूनही कोरडीठाक असून, ब्राह्मणशेवगे ४३, देवळी - भोरस १८ तर पथराड धरण १२ टक्के भरले आहे.

१...

शिवाजीघाट जलमय

याच परिसरात तळेगावकडून येणारी तितूर व पाटणादेवीकडून येणाऱ्या तितूर नदीचा संगम होतो. यामुळे या परिसरात पाण्याचा वेग वाढतो. पाण्याची पातळीही वाढते. बुधवारी हीच परिस्थिती येथे ओढावली. नव्या पुलावरील सर्व दुकानांमध्ये आठ ते दहा फुटांपर्यंत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. पुराच्या पाण्याचा वेग मोठा असल्याने हे पाणी मुख्य बाजारपेठेतही शिरले. स्टेशनरोडलगतच्या गल्ल्यांमध्येही आठ ते दहा फूट पाणी साचल्याने वाहने पाण्यात तरंगत होती. तितूर नदीच्या पुराचे पाणी तहसील कार्यालयाजवळील वीर सावरकर चौकापर्यंत तर घाट रोडवरील डॉ. पूर्णपात्रे रुग्णालयापर्यंत पोहोचले होते. यामुळे नदीपलीकडील नागरिकांचा संपर्क तुटला. न.पा.च्या जलतरण तलावानजीक असणाऱ्या घरांमध्येही पुराचे पाणी शिरल्याने वसंत मरसाळे व इतर नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले.

Web Title: Chalisgaon News Link

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.