चाळीसगाव, पाचोरा मोर्चाने दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2017 12:25 AM2017-04-27T00:25:50+5:302017-04-27T00:25:50+5:30

मागण्यांसाठी लोक एकवटले : बहुजनांचे शक्तिप्रदर्शन, रेल्वेबाबतच्या समस्या

Chalisgaon, Pachora Morchay gave tremendous attention | चाळीसगाव, पाचोरा मोर्चाने दणाणले

चाळीसगाव, पाचोरा मोर्चाने दणाणले

Next

चाळीसगाव : बहुजन क्रांती मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. एकूण 14 मागण्यांसाठी रेल्वेस्थानकापासून अत्यंत शिस्तबद्ध रीतीने मोर्चा काढण्यात आला. ‘एकच पर्व.. बहुजन सर्व’ अशा घोषणांनी मोर्चेक:यांनी शहर परिसर दणाणून सोडला. सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. रेल्वेस्थानकापासून ते भाजीबाजारमार्गे हा मोर्चा निघाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या समोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या वेळी वक्त्यांनी सरकारच्या धोरणावर टीकास्त्र सोडले.
पाचोरा : येथे पाचोरा तालुका जनता रेल्वे कृती समितीने मोर्चाचे नेतृत्व केले. सकाळी मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने काढण्यात आला. रिक्षा संघटनांसह सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. रेल्वे समस्यांबाबत मोर्चेक:यांनी  विविध घोषणा दिल्या.  रेल्वे प्रशासनाला समस्यांबाबत निवेदनही देण्यात आले. मोर्चात काँग्रेस, आरपीआय, ग्राहक सेवा संघ, मराठा सेवा संघ, डॉक्टर असोसिएशन, वकील संघटना, प्रवासी संघ, व्यापारी आघाडी, माळी संघ, विद्यार्थी रेल ग्रुप आदी संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

चाळीसगाव- 26 रोजी विविध मागण्यांसाठी बहुजन समाजाचे लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी बहुजन क्रांती मोर्चात उत्साही सहभाग नोंदवला. सकाळी 11 वाजता रेल्वेस्थानकापासून बहुजन क्रांती मोर्चाला सुरुवात झाली.
एकच पर्व- बहुजन सर्व.. , संविधान चिरायू होवो अशा घोषणा मोर्चेक:यांनी दिल्या.
मोर्चा सिग्नल पॉईंट, भाजीबाजार, घाट रोडमार्गे निघून तहसील कार्यालय आवारात त्याची सांगता झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
या वेळी झालेल्या सभेत बामसेफचे हमीद शेख व औरंगाबाद येथील  बहुजन क्रांती मोर्चाचे प्रचारक प्रदीप तळेकर यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली.
मराठा समाजाच्या आरक्षणाला बहुजनांचा विरोध नसून त्यांना  आरक्षण मिळालेच पाहिजे.          धनगर व मुस्लीम बांधवांनाही आरक्षणाचा अधिकार  घटनेला    धरून आहे, असेही त्यांनी  या वेळी सांगितले.
व्यासपीठावर प्रा.गौतम निकम, ओंकार जाधव, कमल नेतकर, कीर्ती देसले, अलका मोरे, अॅड.कविता निकम, रायुकाँ अध्यक्ष अमोल चौधरी, प्रकाश पाटील, य™ोश बाविस्कर, अतुल गायकवाड, सोमनाथ माळी, ज्ञानेश्वर राठोड, योगेश्वर राठोड, मोतीलाल अहिरे, साईदास जाधव, चंद्रसिंग मोरे, एकनाथ सोनवणे, संजय सोनवणे,  शत्रुघ्न नेतकर, नितीन पवार, अरविंद खेडकर, प्रवीण जाधव, राकेश निकम यांचेसह महिलाही मोठय़ा संख्येने  उपस्थित होत्या.
पाचोरा- रेल्वेस्थानकावरील समस्या व सुपरफास्ट गाडय़ांना थांबा मिळावा यासाठी  पाचोरा शहरवासीय मोर्चाद्वारे एकवटले. सकाळी साडेनऊ वाजता गांधी चौकातून समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरी थेट रेल्वेस्थानकावर धडकल्याने रेल्वे प्रशासन चांगलेच हादरले. विविध घोषणांनी  मोर्चेक:यांनी शहर परिसर दणाणून सोडला. शहरात प्रथमच रेल्वे समस्यांबाबत जनतेत मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आली.  यासाठी ग्राहक सेवा संघाने पुढाकार घेतला. यासाठी पाचोरा तालुका जनता रेल्वे कृती समितीची स्थापनाही करण्यात आली. महाराष्ट्र एक्स्प्रेसचे प्रवासी डबे वाढवणे, पीजे मार्गाचे रुंदीकरण आदी समस्यांचे निवेदन स्टेशन अधीक्षक एस.डी.पाटील व वाणिज्य निरीक्षक आर.पी.बागुल यांना देण्यात आले. या वेळी पो.उ.नि. केशव पातोंड, जीआरपीएफचे निरीक्षक सोनवणे, एकनाथ चंदनशिव, दिनेश पाटील, डॉ.रूपेश पाटील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, राजेंद्र प्रजापत, किशोर बारवकर, अरुण पाटील, पप्पू राजपूत, नाना चौधरी, विठ्ठल महाजन, ललित पटवारी, अॅड. प्रवीण पाटील, सुधाकर महाजन, कविता महाजन, संगीता वाणी, मीनाक्षी दिवटे, शमा शर्मा, राधेश्याम दायमा, डॉ.भरत पाटील, राधा शर्मा, प्रतिभा परदेशी, गोपाळ पटवारी, संदीप जैन, सचिन सोमवंशी, एस.टी. सावळे आदी सहभागी झाले होते. पोलीस बंदोबस्त चोख होता.

Web Title: Chalisgaon, Pachora Morchay gave tremendous attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.