चाळीसगाव पंचायत समितीतर्फे अंगणवाडी मदतनीस, सेविकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:20 AM2021-06-09T04:20:14+5:302021-06-09T04:20:14+5:30
याप्रसंगी सभापती अजय पाटील, उपसभापती सुनील पाटील, माजी सभापती संजय पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सहायक गटविकास अधिकारी ...
याप्रसंगी सभापती अजय पाटील, उपसभापती सुनील पाटील, माजी सभापती संजय पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सहायक गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, पंचायत समिती सदस्य लता दौंड, भाऊसाहेब केदार, शिवाजी सोनवणे, जिभाऊ पाटील, पीयूष साळुंखे, सुभाष पाटील, दत्तू मोरे, दिनेश बोरसे आदी उपस्थित होते.
कोरोनाशी दोन हात करीत कोविड-१९ या महामारीच्या दुसऱ्या लाटेत यशस्वीपणे धुरा सांभाळणाऱ्या अन कर्तव्य बजावणाऱ्या महिला भगिनींचा हा सत्कार नसून सेवाप्रती कार्य करणाऱ्या रणारागिणींचा गौरव आहे, असा उपक्रम चाळीसगाव पंचायत समितीतर्फे पहिल्यांदाच जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ऑनलाइन एमआयएस अंतर्गत माता बैठक, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची वजन स्थिती, पोषण आहार, शालेय पूर्व शिक्षणात केलेले कार्य व कोविड काळात केलेली जनजागृती या आधारे करण्यात आलेला सन्मान गौरवास्पद राहिला असल्याचे प्रतिपादन यावेळी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केले.
यावेळी उर्मिला चौधरी (बहाळ), शोभा एरंडे (रांजणगाव), मंगला देशमुख (मेहुनबारे), सुनीता गुंजाळ (खरजई), रेखा तिरमली (लोंढे) या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या अंगणवाडी मदतनीस व सेविकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कक्ष अधिकारी मनोहर गांगुर्डे, कार्यालयीन अधीक्षक किरण मालाजंगम, विस्तार अधिकारी कैलास माळी, ग्रामविकास अधिकारी दिगंबर शिर्के, कनिष्ठ सहायक संगीता जाधव, धीरज पाटील, हेमंत पाटील, तुषार माळी आदींचे सहकार्य लाभले.