चाळीसगाव तालुक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:13 AM2021-06-03T04:13:41+5:302021-06-03T04:13:41+5:30
चाळीसगाव : गेल्या १५ दिवसांत चाळीसगाव परिसरात बुधवारी तिसऱ्यांदा मान्सूनपूर्व पाऊस झाला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा ...
चाळीसगाव : गेल्या १५ दिवसांत चाळीसगाव परिसरात बुधवारी तिसऱ्यांदा मान्सूनपूर्व पाऊस झाला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने उकाडा कमालीचा वाढला आहे.
बुधवारी साडेपाच वाजता विजांच्या कडकडाटासह पावसाने रिमझिम हजेरी लावली. सुखद गारवा निर्माण झाला. बागायती कपाशीची लागवड मान्सूनपूर्व पावसाचा मुहूर्त साधून केली जाते. त्यामुळे हा पेराही येत्या काही दिवसांत वेगाने होईल, असा शेतकऱ्यांचा सूर आहे.
उंबरखेडला आजही तासभर पाऊस झाला. यामुळे कपाशी लागवड झालेल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. ऊस, मका, इतर पिकांनाही फायदा होईल. मेहुणबारे येथे तासभर पाऊस झाला. यामुळे चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आडगाव आणि करगाव येथे बुधवारी दोन तास पाऊस झाला. तीन-चार दिवसांपासून पावसाची कमी-जास्त प्रमाणात हजेरी लागत आहे. कपाशी लागवड जास्त होताना दिसत आहे.