चाळीसगाव तालुक्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:34 AM2021-09-02T04:34:08+5:302021-09-02T04:34:08+5:30

१६ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त : अनेक घरांची पडझड, पंचनामे सुरू चाळीसगाव, जि. जळगाव : शहर व ...

In Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यातील

चाळीसगाव तालुक्यातील

Next

१६ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त : अनेक घरांची पडझड, पंचनामे सुरू

चाळीसगाव, जि. जळगाव : शहर व तालुक्यात मंगळवारी आलेल्या महापुराने ४१ गावांना मोठा फटका बसला आहे. येथील खरिपातील पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. शेतातील माती वाहून गेल्याने पिके आडवी झाली. अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. जवळपास १६ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चाळीसगाव व परिसरात मंगळवारी पहाटेपासून जवळपास १२३.२ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर यात दोन जणांचा मृत्यू झाला.

कपाशी, मका, सोयाबीन, कडधान्ये, फळबाग पिकांना फटका बसला आहे. जवळपास १६ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेली गावे अशी : चाळीसगाव, ओझर, टाकळी प्र. चा., बेलदारवाडी, गणपूर, कोदगाव, रांजणगाव, बाणगाव, वाकडी, वाघडू, रोकडे, हातले, वाघले, जावळे, जामडी, कोंगानगर, भामरे बु.,भामरे खु., चांभार्डी खु.,चांभार्डी बु, एकलहरे, तांबोळे बु.,तांबोळे खु., निमखेडी, गणेशपूर, पिंप्री बु.,चितेगाव, सांगवी, बोढरे, जुनोने, तळोंदे प्र. चा., वलठाण, चंडिकावाडी, पाटणा, शिवापूर पिंपरखेड, लोंजे, आंबेहोळ पाथरजे खेर, सोनगाव, पिलखोड या गावांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या महापुराचा जास्त फटका खर्डे गावाला बसला आहे. या गावातील १५० वर पशुधन वाहून गेले अथवा मृत झाले आहेत.

दुसरीकडे भडगाव तालुक्यात तितूर नदीला आलेल्या महापुरामुळे कजगाव, भोरटेक, उमरखेड,व पासर्डी येथील साडेचारशे ते पाचशे एकर शेती क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक घरांत पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्य खराब झाल्याने

अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. दरम्यान, दरड कोसळल्याने बंद पडलेला कन्नड घाटात अजूनही रस्ता साफ करण्याचे काम सुरू

असल्याची माहिती मिळाली.

Web Title: In Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.