चाळीसगावात चोरट्याने किराणा दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:21 AM2021-08-22T04:21:15+5:302021-08-22T04:21:15+5:30
किराणा दुकान मालक दीपक अशोक पाखले हे शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी गेले असता, त्यांना किराणा दुकानाचे शटरचे कुलूप ...
किराणा दुकान मालक दीपक अशोक पाखले हे शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी गेले असता, त्यांना किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तुटलेल्या व शटर अर्धवट उघडलेल्या अवस्थेत दिसले. पाखले यांनी दुकानात आत जाऊन पाहिले असता, ड्राॅवरमध्ये ठेवलेले ३९ हजार रुपयांची रोकड, तसेच १,४०० रुपये किमतीचे दोन किलो बदाम व १,५०० रुपये किमतीचे दोन किलो काजूची पाकिटे, असा एकूण ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी दीपक पाखले यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावरून चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. याच कॉम्प्लेक्सच्या रांगेत असलेल्या परफेक्ट मेन पार्लरच्या दुकानातही चोरट्याने प्रवेश करून, दुकानातून एक हजार रुपयांची रोकड चोरून नेली. जवळच असलेल्या दोन किराणा दुकाने फोडण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तो अयशस्वी ठरला असल्याचे सांगण्यात आले.