चाळीसगावच्या चिमुरडय़ांचा अनोखा दीपोत्सव, प्रदुषणमुक्त दिवाळीची घेतली शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:41 PM2017-10-14T12:41:20+5:302017-10-14T12:45:05+5:30
मनामनात उजळू दे आनंद प्रकाश
ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 14 - ‘दु:खाचा अंधार जाऊ दे..अन् मनामनात आनंद प्रकाश पसरु दे..’ असा कृतीयुक्त संदेश देत चाळीसगावच्या व्ही.एच. पटेल प्राथमिक विद्यालयातील इयत्ता दुसरीच्या चिमुरडय़ांनी स्वत: बनविलेल्या आकाश कंदिलांमध्ये प्रदुषमुक्त दिवाळीचे दिवे प्रज्वलीत केले. फटाके न फोडता दिवाळी साजरी करण्याची शपथही घेतली.
विद्याथ्र्यांना शनिवारपासून दिवाळी पर्वाच्या सुटय़ा लागल्या आहे. इयत्ता दुसरीच्या विद्याथ्र्यांनी कायार्नुभव विषयांतर्गत स्वत: साहित्य आणून आकाश कंदील बनविले. घोटीव रंगीबेरींग कागद, पुठ्ठा, डिंक, कैची, चमकीचे अनेकरंगी कागद यांचा वापर करीत 30हून अधिक आकाश कंदील तयार केले. कलाकुसर आणि कल्पकता यांचे मनोहारी दर्शन घडवत त्यांनी प्रथम सत्राची शनिवारी सांगता करतांना दिवाळीच्या स्वागतासाठी जणू आकश कंदीलांचे तोरणच सजविले. त्यांचे चेहरे प्रकाशाच्या संदेशाने आणखीनच उजळून गेले होते.
मुख्याध्यापक भाऊसाहेब जगताप आणि वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन विद्याथ्र्यांना लाभले. शाळा समितीचे चेअरमन राजेंद्र चौधरी, सचिव डॉ. विनोद कोतकर, सदस्य योगेश अग्रवाल, क.मा. राजपूत, नीलेश छोरिया हे सर्व विद्याथ्र्यांची कलाकुसर पाहूुन भारावले. त्यांनी रोख बक्षिसे देऊन चिमुरडय़ांच्या कलेला दाद दिली.