चाळीसगावच्या 'सर्वोदय'मध्ये सत्ताधारीच 'किंगमेकर'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 10:06 PM2021-05-03T22:06:48+5:302021-05-03T22:07:12+5:30
विरोधकांचा निवडणुकीत सपशेल धुव्वा उडाला.
चाळीसगाव : कोरोना महामारीसह टाळेबंदीत निवडणुक होत असलेल्या उंबरखेडेस्थित सर्वोदय शिक्षण संस्थेच्या रविवारी झालेल्या निवडणुकीचा सोमवारी लागलेल्या निकालात विद्यमान सत्ताधारीच किंगमेकर ठरले आहे. कै. रामराव जिभाऊ पाटील व कै. उदेसिंह पवार स्मृती पॕनलने सर्व १९ जागा जिंकत विरोधी परिवर्तन पॕनलचा सपशेल धुव्वा उडविला आहे. मतदारांनी सत्ताधा-यांना एकतर्फी कौल दिल्याने विरोधी पॕनलचे तिघेही प्रमुखही पराभूत झाले आहे. माजी जि.प.सदस्य व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विकास पंडितराव पाटील व विद्यमान सचीव उदेसिंग मोहन पाटील यांनी सत्ता पुन्हा राखत संस्थेवरील आपली मांड पक्की केली आहे.
संस्थेच्या १९ जागांसाठी रविवारी मतदान झाले. एकुण ८८ टक्के मतदान झाले. न्यायालयाच्या निर्णयाने ऐनवेळी नव्याने केलेल्या ६७० सभासदांनाही मतदानाची संधी मिळाली. एकुण ४६८१ पैकी ४६२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सोमवारी उंबरखेडे येथील संस्थेच्या वसतिगृहातील सभागृहात एकुण १० टेबलवर मतमोजणी सुरु झाली. सुरुवातील सर्व मतपत्रिकेचे संकलन करुन गठ्ठे तयार केले गेले. यानंतर महिला राखीव, अनु जाती - जमाती, इतर मागास, भटक्या - विमुक्त गटातील निकाल जाहिर केले गेले. मतमोजणीच्या एकुण २७ फे-या झाल्या. एका फेरीत १५० मतांची मोजणी झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून विजयसिंग गवळी यांनी काम पाहिले. त्यांना एकुण २५ कर्मचा-यांनी सहकार्य केले. सर्वात शेवटी सर्वधारण गटातील मतांची मोजणी झाली.
....
चौकट
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशीः
विमुक्त जाती - भटक्या जमाती - उदेसिंग मोहन पाटील (२६७७)
इतर मागास - संजय संतोष पाटील (२४५५), अनु जाती - जमाती - वर्षा नाना कोळी (२४९८), महिला राखीव - अनिता नितिन पाटील - (२३९६), साधना शामकांत निकम - (२३२३)
......
सर्वसाधारण गट
....सर्वसाधारण गटातील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते
भगवान अमरसिंग पाटील - (२५४९), विकास पंडितराव पाटील - (२५१४), प्रशांत मुरलीधर पाटील - (२४८७), प्रविण भिकन पाटील - (२४४५), राजेंद्र महारु पाटील - (२४४५), नरसिंग हाटेसिंग पाटील - (२४३५), योगेश नीळकंठ भोकरे - (२३९२), उमेश प्रकाश करपे - (२३८५), सुरेश श्रीपतराव सोनवणे - (२३६४), इंद्रसिंग उदेसिंग पवार - (२३६१), आनंदा फकिरा पाटील - (२३१२), भाऊसाहेब भिकनराव जगताप - (२२८१), अशोक परमेश्वर चौधरी - (२१९६), नेताजी कैलास हिरे - (२१८३) या गटात भगवान अमरसिंग पाटील यांना सर्वाधिक मते मिळाली आहे.
....
विरोधकांचा खोटा प्रचार नाकारला
कै. रामराव जिभाऊ पाटील व कै. उदेसिंह पवार यांच्या विचारांचे पाईक म्हणून मतदारांनी आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. सर्व कार्यकर्त्यांची एकजूटीचा हा विजय आहे. विरोधकांचा खोटा प्रचार मतदारांनी पूर्णपणे नाकारला. संस्थेच्या पारदर्शी कारभारासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- विकास पंडितराव पाटील
प्रमुख स्मृती पॕनल व विद्यमान अध्यक्ष, सर्वोदय शिक्षण संस्था
......
सभासद विश्वास सार्थ ठरवू
विरोधकांनी खोट्या प्रचाराच्या तोफा वाजवल्या. मात्र सभासद मतदारांनी आमच्या कारभारावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. त्यांच्या याविश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
- उदेसिंग मोहन पाटील
प्रमुख स्मृती पॕनल व विद्यमान सचीव, सर्वोदय शिक्षण संस्था.
......
'त्या' मतदारांमुळे बसला फटका
सत्ताधा-यांनी बोगसरित्या केलेल्या ६७० सभासदांचा फटका बसल्यानेच आमचा पराभव झाला. आम्ही याविरोधात न्यायालयातही दाद मागितली होती. बाद होणा-या मतदानाची संख्या देखील मोठी आहे.
- रवींद्र चुडामण पाटील
प्रमुख परिवर्तन पॕनल