Vidhan Sabha 2019 : मतदानाचा टक्का वाढविणे हेच आव्हान - जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 01:18 PM2019-09-25T13:18:12+5:302019-09-25T13:26:23+5:30

ईव्हीएमबाबत समाधान होईपर्यंत प्रात्यक्षिक दाखविण्याची तयारी

The challenge is to increase the voting percentage | Vidhan Sabha 2019 : मतदानाचा टक्का वाढविणे हेच आव्हान - जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

Vidhan Sabha 2019 : मतदानाचा टक्का वाढविणे हेच आव्हान - जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

googlenewsNext

सुशील देवकर 
जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. निवडणुकीसाठी प्रशासनाची काय तयारी झाली आहे? याबाबत जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे म्हणाले की, मतदान केंद्र निश्चित करण्याचे तसेच मतदार यादी अंतीम करण्याचे काम महत्वाचे असते. जिल्ह्यात ३५३२ मतदान केंद्र व ५४ साह्यकारी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.
२० हजार मतदार वाढले
मतदार यादी निश्चित झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३४ लाख ४७ हजार १४८ इतके मतदार आहेत. १५ जुलै पासून राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत तब्बल २० हजार मतदार समाविष्ट झाले असल्याची माहिती डॉ.ढाकणे यांनी दिली.
मतदार केंद्रांमधील सुविधांवर लक्ष
जिल्हाधिकारी म्हणाले की, मतदान केंद्रांसाठी ग्रामीण भागात जि.प. शाळा घेण्यात येतात. मात्र अनेक शाळांचे वीज कनेक्शनच थकबाकीमुळे कट करण्यात आलेले आहेत. त्यामुळे महावितरणला मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत हे कट केलेले वीज कनेक्शन पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधीतांनाही वीज बिलाची थकबाकी भरण्याचे आदेश दिले आहेत.
विश्वास बसेपर्यंत प्रात्यक्षिक दाखवू
ईव्हीएमबाबत अजूनही काही लोकांच्या मनात शंका असल्याची विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, कुणाला अजूनही ईव्हीएमवरील मतदानाबाबत शंका असल्यास कुठल्याही तहसीलदार कार्यालयात अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात यावे. त्याच्या शंकांचे निरसन केले जाईल. अगदी संबंधीताचे समाधान होईपर्यंत बटन दाबून मतदानाची प्रक्रिया करून दाखविली जाईल. तसेच व्हीव्हीपॅटही असल्याने शंका घेण्याचे कारण नाही, असे सांगितले.
ईव्हीएमच्या सुरक्षेची काळजी
मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यातील ३६० मतदान केंद्रांवर वेबकास्टींग करण्यात येणार आहे. तसेच ईव्हीएमची वाहतूक करणाºया वाहनांसह निवडणूक प्रक्रियेतील सर्वच वाहनांवर जीपीएस ट्रॅकर बसविण्यात येणार आहेत. तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकेही स्थापन करण्यात आले असून तीन नाक्यांवरही पथके तैनात करण्यात आले आहेत.
कारवाईत कोणीही अपवाद नाही
आचारसंहितेचे काटेकोर पालन प्रत्येकाला करावेच लागेल. कोणी कितीही मोठा, कितीही पॉवरफुल असला तरीही कुणालाही क्षमा नाही. लगेच व निष्पक्षपणे कारवाई केली जाईल. २७ पासून उमेदवारी अर्ज दाखल करणे व त्यानंतर प्रचारास सुरूवात होईल. उमेदवारी अर्ज शासकीय छापखान्यातून प्राप्त होत आहेत. काही अर्ज प्राप्त झाले आहेत. सभांसाठी मैदानांची परवानगीही ‘प्रथम येणाºयास प्राधान्य’ या तत्वावर दिली जाणार असल्याचे डॉ.ढाकणे यांनी सांगितले.

Web Title: The challenge is to increase the voting percentage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव