कोरोनासह अन्य साथरोगांचेही आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 12:44 PM2020-07-05T12:44:45+5:302020-07-05T12:45:28+5:30

अबेटींग, सफाई होणार

The challenge of other communicable diseases, including corona | कोरोनासह अन्य साथरोगांचेही आव्हान

कोरोनासह अन्य साथरोगांचेही आव्हान

Next

जळगाव : सध्या कोरोनाचे थैमान सुरु असून, शहरात दररोज ३० ते ४० कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेची सर्व यंत्रणा कोरोनावरील उपाययोजनांवर काम करत आहे. मात्र, पावसाळ्याचे दिवस असल्याने याच काळात शहरात डेंग्यू, चिकुनगुनीयासह इतर आजार देखील बळावतात. मात्र, कोरोना किंवा इतर आजारांचेही सुरुवातीचे लक्षणे ताप किंवा सर्दी आहेत. अशा लक्षणांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होवू शकते. त्यामुळे कोरोनासोबतच इतर साथरोगांवर उपाययोजना करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
दरवर्षी शहरात पावसाळ्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात फोफावत असतात. मात्र, नेहमीपेक्षा यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. कारण गेल्या साडेती महिन्यांपासून कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन जाहीर झाले आहे. त्यातच शहरात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरात कोरोनाने बाधीत असलेल्या रुग्णांची संख्या ८०० च्या घरात पोहचली आहे. त्यातच आता पावसाळ्यात साथीचे आजार देखील वाढत आहेत. कोरोनाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड भिती आहे. यातच साथीचे आजार देखील वाढले तरी नागरिकांच्या मनात कोरोनाचीच भिती अधिक असेल त्यामुळे लहान-मोठे लक्षणे देखील झाल्यास नागरिकांना कोरोनाचीच भिती वाटणार नाही. अशा परिस्थितीत मनपाला नागरिकांच्या मनपातील भिती दुर करण्याशिवाय साथीचे आजार रोखण्याचे आव्हान राहणार आहे.
तात्काळ उपाययोजना करा - उपमहापौर
पावसाळ्यात डेंग्यू सारख्या आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होता. माशा, डास व इतर किटकांच्या फैलावामुळे रोगराई पसरते. गेल्या वर्षी शहरात डेंग्यूची साथ पसरली होती. यंदा ही साथ पसरली तर शहरात खळबळ निर्माण होईल म्हणून महापालिका प्रशाासनाने वेळीच उपाययोजना करण्याचा सूचना उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी मनपा आयुक्तांना दिल्या आहेत. याबाबतचे पत्र उपमहापौरांनी आयुक्तांना दिले आहे.
अबेटींग, सर्वेक्षणाच्या कामाला सोमवारपासून सुरुवात
मनपाची सर्व यंत्रणा कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये व्यस्त आहे. अशा परिस्थितीत इतर साथीचे आजार रोखण्याची सर्व जबाबदारी आरोग्य विभागावर सोपविण्यात आली असून, आरोग्य निरीक्षक,अधीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांकडून सोमवारी शहरात विविध भागांची पाहणी करण्यात येणार आहे. तसेच ज्या घरांमध्ये पाणी साचण्याची ठिकाणे आहेत. अशा घरांना नोटीस देण्यात येणार आहे. यासह विविध भागात अबेटींग, फवारणीचेही काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी पवन पाटील यांनी दिली. सोमवारपासून या कामांना सुरुवात होणार आहे.

Web Title: The challenge of other communicable diseases, including corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव