लोकसभा निर्विघ्न पार पाडण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:12 AM2019-03-23T11:12:04+5:302019-03-23T11:15:50+5:30

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यात तिसºया टप्प्यात अर्थात २३ एप्रिल रोजी रावेर आणि जळगाव मतदार संघासाठी मतदान होणार आहे.

Challenge of smooth running the Lok Sabha | लोकसभा निर्विघ्न पार पाडण्याचे आव्हान

लोकसभा निर्विघ्न पार पाडण्याचे आव्हान

Next
ठळक मुद्देआॅनलाईन विश्लेषणपोलीस दलाची कसरत अवैध धंदे पुन्हा सुरु

सुनील पाटील
जळगाव : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यात तिसºया टप्प्यात अर्थात २३ एप्रिल रोजी रावेर आणि जळगाव मतदार संघासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व पोलीस प्रशासन तयारीला लागले आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने पाल येथे दोन राज्यांची बॉर्डर कॉन्फरन्स झाली. विशेष पोलीस महानिरीक्षकांचे तीन दौरे झाले. अपर पोलीस महासंचालक दौºयावर येऊन गेले. या दोन्ही अधिकाºयांनी जिल्ह्याचा सूक्ष्म अभ्यास करुन त्याअनुषंगाने कामकाज करण्याच्या सूचना पोलीस अधिकाºयांना दिल्या. सद्यस्थितीत जिल्ह्यात पोलीस अधीक्षकापासून सर्वच अधिकारी नवीन आहेत. जिल्ह्याची फारशी जाण या अधिकाºयांना नाही. चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव एकमेव अनुभवी अधिकारी आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी ते जळगावला पोलीस उपअधीक्षक होते. जळगावची राजकीय व गुन्हेगारी स्थिती पाहता पोलीस अधीक्षकांसमोर मोठे आव्हान आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीत गुन्हेगारी उफाळून आली होती. यावेळी पोलीस दलावर पक्षपातीचा आरोप झाला होता. राजकीय दबावाखाली यंत्रणा झुकल्याचा उघड आरोप झाला होता. त्यामुळे या निवडणुकीत हा डाग पुसून काढणे एक आव्हान आहे. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांची ही पहिलीच कार्यकारी पोस्टींग आहे, त्यात सर्वच अधिकारी नवखे,त्यामुळे त्यांचा चांगलाच कस लागणार आहे. कायदा सुव्यवस्था असो कि गुन्हेगारांवरील कारवाया करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यात व्हाईट कॉलर गुन्हेगारांवर काय व कशी कारवाई होते, हे देखील पाहणे औत्सुकत्याचे आहे.त्यात आता भर पडली आहे ती अवैध धंद्याची. जिल्ह्यात बंद असलेले अवैध धंदे उघडपणे सुरु झाले आहेत. जामनेर येथे तर सट्टा बाजार नावाचे मार्केटच सुरु झाले आहे. या बाजारपट्ट्यात भाजापीला विक्रेते बसतात तसे सट्टा घेणाºयांनी दुकाने लावली आहेत. इतर तालुक्यातही अवैध धंदे जोरात आहेत, मात्र त्याच जामनेर जरा जास्तच वरचढ ठरले आहे. या साºया परिस्थितीत पोलीस दलासमोर लोकसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्याचेच खरे आव्हान आहे.

Web Title: Challenge of smooth running the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.