शिंपी बांधवांसमोर स्पर्धेचे आव्हान, ‘रेडीमेड’मुळे ‘पारंपारिक’ व्यवसायाला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:52 PM2018-02-28T12:52:19+5:302018-02-28T12:52:19+5:30

Challenge traditional 'business' | शिंपी बांधवांसमोर स्पर्धेचे आव्हान, ‘रेडीमेड’मुळे ‘पारंपारिक’ व्यवसायाला उतरती कळा

शिंपी बांधवांसमोर स्पर्धेचे आव्हान, ‘रेडीमेड’मुळे ‘पारंपारिक’ व्यवसायाला उतरती कळा

Next
ठळक मुद्देस्पर्धा वाढल्याने उतरती कळाकुटूंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न

जिजाबराव वाघ/आॅनलाइन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. २८ - ‘स्टाईलीश रेडीमेड’ कपड्यांमुळे पारंपारिक कपडे शिवण्याच्या व्यवसायाची वीणच उसवली असून शिंपी बांधवांसमोर स्पर्धेत टिकून राहण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. २८ फेब्रुवारी रोजी जागतिक टेलरिंग दिनी याचा आढावा घेतला असता, पारंपारिक कपडे शिवण्याच्या व्यवसायाला उतरती कळा लागल्याचे वास्तव समोर आले आहे.
विवाह समारंभ असो की सण उत्सव नविन कपडे परिधान करुन तो साजरा करतांना त्याला नाविन्याची झळाळी येते. पूर्वी कपडे शिंपींकडून कपडे शिवून घेण्याची लगबग असायची. दुकानातून कापड आणून ड्रेस शिवण्यासाठी शिंपी बांधवांकडे दिले जायचे. १९९० नंतर तयार म्हणजेच रेडीमेड स्टाईलिश आणि फ?शनेबल कपड्यांचा ट्रेंड आल्याने पारंपारिक पद्धतीने कपडे शिवण्याच्या व्यवसायासमोर हे आवाहन होते. यानंतर गेल्या तीस वर्षात रेडीमेड व्यवसायाने जम बसाविला तर कालौघात पारंपारिक शिवणकाम मरणपंथाला लागले. ग्रामीण भागात आलुतेदार - बलुतेदार पद्धतीने कपडे शिवले जात. मात्र अलिकडच्या काही वर्षात हे चक्र देखील मोडकळीस आले आहे. सर्वांचाच तयार कपडे घेण्याकडे कल वाढल्याने कारागिर असणा-या शिंपींना एकतर मोठ्या महानगरात स्थलांतर करावे लागले. काहींनी उदरनिवार्साठी वेगळा व्यवसाय सुरु केला.
स्पर्धा वाढल्याने उतरती कळा
ग्रामीण भागातही रेडीमेड कपडे मिळू लागले आहेत. शहरात आणि मेट्रो सिटीज मध्ये तर बड्या कंपनांच्या शोरुमने बस्तान बसविले आहे. याबरोबरच 'वन गेट बाय टू' या फ्री संस्कृतीनेही ग्राहकांना भुरळ घातली. धावपळीच युग असल्यानेही कपडे शिवून घेण्याची वेळखाऊ पद्धत मागे पडली. पारंपारिक कपडे शिवण्याचा व्यवसाय अशा समस्यांच्या चक्रात अडकला आहे.
आभाळच फाटले, टाके घालायचे कुठे
काळाची पावले ओळखून पारंपारिक व्यवसायात फारसे बदल झाले नाही. नव्या ट्रेंडसचा अंगिकार न करणे, अत्याधुनिक यंत्रांची कमतरता, नव्यानव्या स्टाईल जाणून घेण्यासंबंधीचा अभाव, साधनांचा तुटवडा अशा नानाविध प्रश्नांनी पारंपारिक व्यवसायाचे आभाळच फाडले. त्यामुळे सद्यस्थितीत शिंपींना रफू करणे, बटन लावणे, ऊसवलेले शिवून देणे, चेन बसविणे अशी फुटकळ कामेच उरली आहेत. त्यांचे संघटनही नसल्याने समस्येची तीव्रता समोर ठळकपणे समोर येत नाही.
कुटूंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न
उदारीकरणामुळे सर्वच पारंपारिक व्यवसायांना नख लागले. मात्र यात न्हावी बांधवांनी काळाची पावले ओळखून सलून दुकानांना स्टाईलिश केले. नव्या ट्रेंडचा स्विकारही केला. इतर पारंपारिक व्यवसाय मात्र उदारीकरणाच्या टाचेखाली चिरडले गेले. एकट्या चाळीसगाव शहर व तालुक्यात एक हाजाराहुन अधिक कपडे शिवणा-या शिंपी कुटुंबांसमोर व्यवसाय बुडाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. सर्वदुर हीच परिस्थिती असल्याने समस्येची धग लक्षात यावी. अनेकांनी दुसरा पर्याय शोधला आहे.
२८ फेब्रुवारी रोजी जागतिक टेलरिंग दिन साजरा केला जातो. १७९० मध्ये अमेरिकेत सर विल्यम इलिआस होव यांनी शिवणयंत्राचा शोध लावला. त्यांना शिवणयंत्रांचे जनक संबोधले जाते. त्यांच्याच स्मृतिप्रित्यर्थ टेलरिंग दिन जगभर साजरा केला जातो. १९२७ मध्ये ‘टेलर’ हा शब्द हॉवर्ड विद्यापिठाने डिक्शनरीत समाविष्ट केला.

रेडीमेड कपड्यांमुळे आमच्या पारंपारिक व्यवसायासमोर आवाहनच नव्हे तर अस्तित्वालाही धक्का दिला आहे. अनेक कुटुंबांवर उपासमारीचे आरिष्ट कोसळले आहे. काहींना स्थलांतर करावे लागले असून काहींना अन्य व्यवसाय, मजुरी अशी कामे करावी लागत आहे. तरुणांनी नव्या ट्रेंडसचा स्विकार केला तर त्यांना चांगली संधीही आहे.
- सुरेंद्र शिंपी, टेलर चाळीसगाव

Web Title: Challenge traditional 'business'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.