निंबोल दरोडा प्रकरण पोलिसांसाठी आव्हानात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:16 PM2019-06-24T12:16:40+5:302019-06-24T12:17:38+5:30

अधीक्षकांनी घेतली बैठक : तपासासाठी दहा पथके कार्यरत

Challenging for the Nimbol Daco Case Police | निंबोल दरोडा प्रकरण पोलिसांसाठी आव्हानात्मक

निंबोल दरोडा प्रकरण पोलिसांसाठी आव्हानात्मक

Next

जळगाव : निंबोल, ता.रावेर येथील दरोडा हा पोलिसांसाठी आव्हानात्मक असून लोकांमध्ये विश्वास निर्माण करावयाचा असेल तर प्रत्येकाने जीव ओतून काम करुन गुन्हा उघडकीस आणा अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी या गुन्ह्यात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
डॉ.उगले यांनी रविवारी निंबोल येथे ग्रामपंचायत कार्यालयात पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची बैठक घेतली. त्यात ते बोलत होते. गेल्या आठवड्यात हेल्मेटधारी दोन जणांनी निंबोल येथे विजया बॅँकेत गोळीबार केला होता. त्यात सहायक व्यवस्थापक करणसिंग नेगी यांचा गोळीबारात मृत्यू झाला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त करण्यात आली असून पाच दिवसात या पथकाने नेमका काय तपास केला व काही अडचणी येत आहेत का? याचा आढावा पोलीस अधीक्षक डॉ.उगले यांनी रविवारी घेतला. सकाळी ११.३० ते दुपारी २.३० अशी तीन तास बैठक चालली. यात डॉ.उगले यांनी प्रत्येक पथकातील अधिकारी व कर्मचाºयांचे मत जाणून घेतले. हा गुन्हा उघडकीस आणण्याचे एकच ध्येय प्रत्येकाने ठेवावे, कोणी मोठा किंवा लहान असा विषय नाही.आपण सर्व एका गृपचे सदस्य आहोत. ज्या अधिकारी व कर्मचाºयाला धागा गवसेल व गुन्हा उघडकीस आणेल त्याचे नक्कीच कौतुक होईल.
माहितीचे आदानप्रदान करा
तांत्रिक व नियमित पोलिसिंग या दोन्ही पातळीवर गुन्ह्याचे काम केले जात आहे. प्रत्येकाला मिळणाºया माहितीचे एकमेकांना आदानप्रदान करा. एखाद्या कॉन्स्टेबलने सूचना केली असेल तर ती देखील दुर्लक्षित करु नका. गुन्हा उघडकीस आणणे हेच एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने संकल्प करण्याचे आवाहन डॉ.उगले यांनी केले.
२०१६ मध्येही असाच दरोडा
या बैठकीत अनेक कर्मचाºयांनी आपले मत व्यक्त केले. गुन्ह्याची पध्दत पाहता दोघं संशयित सराईत वाटत नाहीत. जे गुन्हेगार सराईत असतात, ते जीव न घेताही दरोडा यशस्वी करतात. या गुन्हेगारांची रिव्हॉल्वर वापरण्याची पध्दतच वेगळी असल्याचे मत काही कर्मचाºयांनी व्यक्त केले. दरम्यान, २०१६ मध्ये शिरपुर येथे अशाच पध्दतीचा बॅँकेत दरोडा पडला होता. तेव्हा दरोडेखोरांनी हेल्मेट परिधान केले होते. त्या घटनेत कोणाचाच जीव घेतला नव्हता, मात्र पैसे लुटून नेण्यात आले होते. अजूनही हा गुन्हा उघडकीस आलेला नाही असेही एक कर्मचाºयाने सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजचा वापर
या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांकडून प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज दाखविले जात आहे. मेंढपाळ, मजूर, रस्त्यावरील व्यावसायिक, ढाबे चालक यांच्याकडे चौकशी करण्यात आली आहे. मुक्ताईनगर, रावेर, मलकापूर, बºहाणपूर, सेंधवा व खंडवा या भागात पथक तपास करीत आहेत. मिळेल त्या ठिकाणी रात्रीचा निवारा करुन पथक पुढच्या मार्गाला लागत आहेत.

तपास वेगाने सुरु आहे. दहा पथके रात्रंदिवस काम करीत आहेत. दरोडेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल करण्यात आले आहे. नागरिकांनीही आरोपींबाबत काही माहिती असेल तर पोलिसांना द्यावी, त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. गुन्हा उघडकीस येईलच असा विश्वास आहे. -डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक
 

Web Title: Challenging for the Nimbol Daco Case Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.