जळगाव पोलीस भरतीत गैरहजर उमेदवारांना शेवटच्या दिवशी मिळणार संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:07 PM2018-03-12T23:07:07+5:302018-03-12T23:07:07+5:30

पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी ६६ उमदेवार गैरहजर राहिले. या उमेदवारांना शेवटच्या दिवशी संधी दिली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘लोकमत’ ला दिली. दरम्यान, सोमवारी ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ४३४ उमेदवार हजर होते. त्यातील ४२२ उमेदवार विविध चाचणीत पात्र ठरले व १२ उमेदवार अपात्र ठरले आहेत.

The chance for the absent candidates to get the last day of recruitment in Jalgaon police recruitment | जळगाव पोलीस भरतीत गैरहजर उमेदवारांना शेवटच्या दिवशी मिळणार संधी

जळगाव पोलीस भरतीत गैरहजर उमेदवारांना शेवटच्या दिवशी मिळणार संधी

Next
ठळक मुद्देपोलीस भरती प्रक्रिया सुरुपहिल्याच दिवशी ६६ उमेदवार गैरहजर शारीरीक चाचणीत १२ उमेदवार अपात्र

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१२ : पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी ६६ उमदेवार गैरहजर राहिले. या उमेदवारांना शेवटच्या दिवशी संधी दिली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘लोकमत’ ला दिली. दरम्यान, सोमवारी ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ४३४ उमेदवार हजर होते. त्यातील ४२२ उमेदवार विविध चाचणीत पात्र ठरले व १२ उमेदवार अपात्र ठरले आहेत.
पात्र ठरलेल्या ४२२ उमेदवारांची मंगळवारी १६०० मीटर धावण्याची चाचणी घेतली जाणार आहे. तर नवीन ८०० उमेदवारांना बोलावण्यात आले आहे.
पहाटे पाच ते अकरा चालली प्रक्रिया
पोलीस कवायत मैदानावर पहाटे पाच तर सकाळी ११ वाजेपर्यत ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात सुरुवातीला कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर अर्जाची पडताळणी झाली. १०० मीटर धावणे, उंची, छाती मोजमाप, गोळा फेक, लांब उडी व पुलअप्स आदी चाचण्या घेण्यात आले. त्यात ४२२ उमेदवार पात्र ठरले. 
२७ कॅमेºयाद्वारे व्हीडीओ चित्रण
पोलीस भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेºयाच्या निगराणीत होत आहे. त्यासाठी प्रत्येक चाचणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मध्यभागी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे तर समोर अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही अधिकारी पहाटे चार वाजेपासून मैदानावर तळ ठोकून होते. 
असा आहे भरती बंदोबस्त
पोलीस अधीक्षक : १
अपर पोलीस अधीक्षक : १
पोलीस उपअधीक्षक : ६
पोलीस निरीक्षक : १६
सहायक निरीक्षक : २०
उपनिरीक्षक : ३५
पुरुष कर्मचारी : २५३
महिला कर्मचारी : ५२
कॅमेरामन : २७

पुरुष अर्ज : १३ हजार ९५६  
महिला अर्ज : २ हजार ३८३  
एकुण अर्ज : १६ हजार ३३९  

Web Title: The chance for the absent candidates to get the last day of recruitment in Jalgaon police recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.