औपचारिकतेनंतर चंदू चव्हाण घरी परतणार

By admin | Published: January 24, 2017 01:34 AM2017-01-24T01:34:51+5:302017-01-24T01:34:51+5:30

संरक्षण राज्यमंत्री : दबाव निर्माण केल्याने पाकिस्तानने केली चंदूची मुक्तता

Chandu Chavan returned home after the formalities | औपचारिकतेनंतर चंदू चव्हाण घरी परतणार

औपचारिकतेनंतर चंदू चव्हाण घरी परतणार

Next

जळगाव : खान्देशचा सुपूत्र चंदू चव्हाण यांच्या लष्कराकडून  वैद्यकीय चाचणीसह काही औपचारिकता पूर्ण करण्यात येत आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर चंदू कुटुंबीयांना भेटू शकेल अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सोमवारी सकाळी 10.30 वाजता जळगाव जिल्हा भाजपा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली.
29 सप्टेंबर 2016 रोजी चंदू चव्हाण हा चुकून पाकिस्तानात गेला होता. चंदू परत यावा यासाठी खान्देशच नव्हे तर देशभरातील नागरिकांची अपेक्षा होती. आतार्पयतचा इतिहास असा आहे की पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला भारतीय जवान हा कधीही परत आलेला नाही. यामुळे सर्वच जण चिंतीत होते. आपण ज्या वेळी खान्देशात येत होतो त्यावेळी लहानांपासून मोठय़ांर्पयत सर्वजण चंदू केव्हा भारतात येईल, अशी विचारणा करीत होते. चंदूच्या सुटकेसाठी आम्ही संरक्षण मंत्रालयामार्फत प्रयत्न सुरु केले. सुरुवातीला पाकिस्तानने चंदू आमच्याकडे नाही, चौकशी सुरु आहे असे सांगत झुलवित ठेवले. मात्र विदेश मंत्रालय, संरक्षण मंत्रालयामार्फत आम्ही आंतरराष्ट्रीयस्तरावर दबाव आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रकरणी संवेदनशील होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पाकिस्तान डीजीएमओ कडून सकारात्मक प्रतिसाद            मिळाला. शनिवारी दुपारी 3 वाजता पाकिस्तानने चंदू चव्हाण याला वाघा बॉर्डरवर भारतीय लष्कराच्या ताब्यात दिले.
पाकिस्तान मधून परत आल्यानंतर चंदू याच्या लष्कराच्या नियमानुसार वैद्यकीय तपासणीसह काही औपचारिक चौकशी पूर्ण होईल. त्यानंतर काही दिवसात तो कुटुंबियांना भेटू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय जवान व खान्देशचा सुपूत्र चंदू चव्हाण याला पाकिस्तानच्या ताब्यातून सोडविण्यासाठी मोठे योगदान दिल्याबद्दल सोमवारी सकाळी 10.30 वाजता जळगाव महानगर भाजपातर्फे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा सत्कार करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर जिल्हा भाजपा कार्यालयात पदवीधर मतदार संघासाठी भाजपाचे उमेदवार डॉ.प्रशांत पाटील यांची प्रचार सभा व जिल्हा पदाधिका:यांच्या भेटीचा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, सुभाष शौचे, महेश जोशी, दीपक सूर्यवंशी उपस्थित होते.  चंदू चव्हाण याला पाकिस्तानच्या ताब्यातून सोडविल्याबद्दल जळगाव महानगर भाजपातर्फे अभिनंदनाचा ठराव माजी             नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी मांडला. हा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.  भाजपाने केंद्रात व राज्यात बहुमत मिळवित सत्ता मिळविली आहे. मात्र गोरगरिबांच्या कल्याणासाठी ज्या ठिकाणी कायदे            होतात त्या विधान परिषदेत अजूनही आपण अल्पमतात आहोत. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघामधील भाजपाच्या उमेदवाराला विजयी करण्याची जबाबदारी          ही प्रत्येक कार्यकत्र्यावर असल्याचे भामरे यांनी           सांगितले.

Web Title: Chandu Chavan returned home after the formalities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.