चंदू चव्हाणचे यांचे जोरदार स्वागत
By admin | Published: March 25, 2017 08:34 PM2017-03-25T20:34:51+5:302017-03-25T20:34:51+5:30
पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यानंतर भारतात सुखरुपपणे परतलेला जवान चंदू चव्हाण हे सुटकेनंतर प्रथमच त्याच्या जन्म गावी आले
ऑनलाइन लोकमत
जळगाव (सामनेर), दि. 25 - पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यानंतर भारतात सुखरुपपणे परतलेला जवान चंदू चव्हाण हे सुटकेनंतर प्रथमच त्याच्या जन्म गावी शनिवारी (25 मार्च) आले. यानिमित्त त्यांचा तसेच संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा ग्रामस्थांतर्फे सायंकाळी भव्य सत्कार करण्यात आला.
सामनेर येथील मूळ गाव असलेला जवान चंदू चव्हाण हा गेल्यावर्षी २९ सप्टेंबरला अनावधानाने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या ताब्यात गेले होते. केंद्र सरकारच्या मोठ्या प्रयत्नानंतर चंदू चव्हाण जानेवारी महिन्यात मायदेशी परतले. त्यानंतर प्रथमच २५ रोजी दुपारी चंदूचे आणि डॉ.सुभाष भामरे यांचे आगमन झाले. जोरदार स्वागतानंतर गावातील म.गांधी विद्यालयात ग्रामस्थांतर्फे आयोजित सत्कार समारंभात भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी , परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे जवान चंदू चव्हाण याला पाकच्या तावडीतून सुखरुपणे स्वदेशात आणता आले.
दोघांचा सत्कार सरपंच प्रिती साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चंदू व त्याचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.