चंदू चव्हाणला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले
By admin | Published: March 25, 2017 07:04 PM2017-03-25T19:04:54+5:302017-03-25T19:24:39+5:30
पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय जवान, खान्देशचा सुपूत्र चंदू चव्हाण याला भारतात पुन्हा परत आणण्याचे मोठे आव्हान होते.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांची ‘लोकमत’ला सदिच्छा भेट : मेक इन इंडियावर संरक्षण खात्याचा भर
जळगाव : पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय जवान, खान्देशचा सुपूत्र चंदू चव्हाण याला भारतात पुन्हा परत आणण्याचे मोठे आव्हान होते. कुठल्याही परिस्थितीत चंदूला मायदेशी आणण्याचा शब्द खान्देशवासीयांना मी दिला होता. पाकिस्तानकडे सतत पाठपुरावा केला व आंतरराष्ट्रीय दबाव आणला व चंदूला मृत्यूच्या दाढेतून भारतात आणण्यात यशस्वी ठरलो, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली.
‘लोकमत’ शहर कार्यालयास त्यांनी शनिवारी दुपारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुळकर्णी, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी केले. यावेळी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी सचिन ओंबासे, तहसीलदार अमोल निकम, उमविच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य दिलीप रामू पाटील, स्वीय सहायक श्यामसुंदर पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी सजिर्कल स्ट्राईक, चंदू चव्हाण यास भारतात कसे आणले? संरक्षण दलाचा मेक इन इंडियावर असलेला भर व मोदी सरकारचा स्वच्छ व पारदर्शी कारभाराबाबत त्यांनी मनमोकळेपणाने संवास साधला.