कोरोनानंतर बांधकाम क्षेत्रातील बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:32 AM2020-12-15T04:32:20+5:302020-12-15T04:32:20+5:30

फार मोठ्या शहरात (मेट्रो)मध्ये सामान्य जीवन मोठ्या प्रमाणात बाधित झालेले दिसून आले व कोरोनाचा परिणाम म्हणून ‘वर्क फ्रॉम होम’ ...

Changes in the construction sector after the corona | कोरोनानंतर बांधकाम क्षेत्रातील बदल

कोरोनानंतर बांधकाम क्षेत्रातील बदल

Next

फार मोठ्या शहरात (मेट्रो)मध्ये सामान्य जीवन मोठ्या प्रमाणात बाधित झालेले दिसून आले व कोरोनाचा परिणाम म्हणून ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना रूढ होऊन स्वीकारली गेली. याचा परिणाम म्हणून जळगावसारख्या शहरातून पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरात कामानिमित्त स्थायित असलेली मंडळी आता आपल्या गावाकडे घर शोधू लागली. कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे ते मूळ गावात नोकरी व पर्यायाने राहण्यासाठी घरे शोधू लागली. नोकऱ्या गेल्यामुळे किंवा कोरोनाकाळात पगार न मिळाल्यामुळे अनेकांना घरे घेण्यासाठी अडचणी आल्या, यावर उपाय म्हणून सरकारने व्याज कर न्युनतम पातळीवर आणला. तसेच राज्य सरकारने स्टॅम्प ड्यूटीमध्ये अभूतपूर्व घसघशीत ३ टक्के सूट दिली, यामुळे घरे घेणाऱ्यांना खूप मोठा दिलासा व गृहबांधणी क्षेत्राला मोठी संजीवनी मिळाली.

कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रातील परप्रांतीय कामगार मंडळी आपआपल्या गावी गेली, ती अजूनही १०० टक्के परत आलेली नाही. याचा परिणाम म्हणून स्थानिक कामगारांना नवीन कामाचे दालन उपलब्ध झाले. बांधकाम क्षेत्रात जास्तीत जास्त मनुष्यबळ लागते, हे मनुष्यबळ संपूर्णपणे स्थानिक पातळीवर उपलब्ध नसते व अजूनही रेल्वे व बससेवा १०० टक्के पूर्ववत झालेली नसल्याने मनुष्यबळाचा तुटवडा जाणवतो. या कामांपैकी जी कामे यंत्राच्या साहाय्याने करण्यासाठी आहेत, ती कामे यंत्रसामग्री घेऊन करून घेण्याकडे कल वाढला आहे.

कोरोनानंतर परदेशातून येणारा कच्चामाल, सामानावर काहीअंशी बंधने असल्यामुळे बऱ्याच बांधकाम साहित्याचे भाव वधारले. अशा वस्तूंची उपलब्धता कमी झाली. अशा वस्तूंचे स्वदेशी पर्याय शोधावे लागले. अशा विविध समस्यांमुळे गृहबांधणी व बांधकाम क्षेत्र सामोरे जात आहे. पण मला भारतीय माणसाच्या जिद्द, चिकाटी व जास्त रोजगारनिर्मिती करणारे, सुमारे २५० कारखान्याचे उत्पादन वापरणारे हे अतिशय महत्त्वाचे क्षेत्र पुन्हा नव्या जोमाने आव्हानांना सामोरे जात, नवीन उभारी घेऊन राष्ट्र बांधणीसाठी एक अतिशय महत्त्वाचे योगदान देईल.

- अनिश शहा

बांधकाम व्यावसायिक

Web Title: Changes in the construction sector after the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.