जिल्ह्यातील ५७ गावांच्या आरक्षणात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:16 AM2021-02-07T04:16:09+5:302021-02-07T04:16:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील ५७ गावांमध्ये सरपंच पदासाठी जे आरक्षण निघाले होते, त्यानुसार आरक्षित प्रवर्गात सदस्यच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील ५७ गावांमध्ये सरपंच पदासाठी जे आरक्षण निघाले होते, त्यानुसार आरक्षित प्रवर्गात सदस्यच नव्हते. त्यामुळे या गावांच्या सरपंचपदाच्या आरक्षणाचा पेच निर्माण झाला होता. हा पेच जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून सोडवला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ५७ गावांचे आरक्षण बदलले आहे. त्यात जळगाव तालुक्यातील शिरसोली, म्हसावद आणि धानवडच्या आरक्षणात बदल झाला आहे.
आरक्षणात बदल करताना त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षणाचा प्रवर्ग बदललेला नाही. त्याऐवजी फक्त महिला सदस्य नसल्याने त्याच प्रवर्गातील पुरुषांना हे आरक्षण मिळाले आहे.
धानवड आणि शिरसोली प्र. न.ला अनुसूचित जमाती महिला असे आरक्षण पडले होते. ते आता फक्त अनुसूचित जमातीसाठी बदलण्यात आले आहे. तर म्हसावदला अनुसूचित जाती महिला असे आरक्षण पडले होते, ते आता अनुसूचित जातीसाठी बदलण्यात आले आहे. सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी हे आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यासोबतच तालुक्यातील जवखेडे येथे अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निघाले आहे. तेथे आरक्षणात बदल करण्यासाठी प्रांताधिकारी पुन्हा ९ फेब्रुवारीला सोडत काढणार आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातील १० गावांमध्ये पुन्हा नव्याने आरक्षण सोडत निघेल. त्यात खाचणे, पुनगाव (ता. चोपडा), रुईखेडा, कोऱ्हाळा (ता. मुक्ताईनगर), विवरे खु. भोर, सुदगाव, मस्कावदसीम, रेंभोटा (ता. रावेर) यांचा समावेश आहे.
कोणत्या गावांच्या आरक्षणात केला बदल
चोपडा - रुखणखेडा, यावल - मनवेल, शिरसाड, कासवे, वड्री खु. रावेर - निंभोरा बु. कोचर बु. रमजीपूर, अजनाड, मोरगाव खु. मुक्ताईनगर - हरताळा, थेरोळा, दुई, बामणदे, पारंबी, बोदवड - चिंचखेडा सीम, आमदगाव, भुसावळ - कंडारी, जाडगाव, मन्यारखेडे, मांडवेदिगर, भिलमाळी, जामनेर - कसबा पिंप्री, हिवरखेडा, बेटावद बु. जळाद्री बु. मेणगाव, पाचोरा - निंभोरी बु. बदरखे, वडगाव कडे, कोल्हे, गाळण, भडगाव - पिंप्री हाट.
चाळीसगाव - खरजई, खडकी बु., पिंप्री बु., पिलखोड, वाघडु, घोडेगाव, अमळनेर - कळमसरे, नीम, म्हसले, खेडी खु. प्रअ. शिरुड, पारोळा - बहादरपूर, शिरसोदे, चिखलोद बु. एरंडोल - ब्राम्हणे - आंबे, पिंपळकोठा बु., पातरखेडे, आडगाव धरणगाव - बांभोरी प्र. चा- भोकणी, सोनवद खु. पष्टाणे खु. पिंपळसीम.