संतांचे चरित्र युवापिढीसाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 09:57 PM2020-01-29T21:57:39+5:302020-01-29T21:57:45+5:30

प्रसाद महाराज यांचे प्रतिपादन : फैजपूर येथे भक्तमाला ग्रंथाचे प्रकाशन

The character of the saints is inspiring for the younger generation | संतांचे चरित्र युवापिढीसाठी प्रेरणादायी

संतांचे चरित्र युवापिढीसाठी प्रेरणादायी

googlenewsNext

फैजपूर : संतांच्या चरित्रामध्ये मोठी शक्ती आहे. या चरित्राचे वाचन व मनन केल्यास चरित्रसंपन्न युवा पिढी घडू शकते. यासाठी युवकांनी संतांची चरित्रे वाचावी, असे आवाहन अमळनेर येथील श्री सखाराम महाराज संस्थानचे गादीपती प्रसाद महाराज यांनी केले.
सखाराम महाराज संस्थानची निर्मिती असलेल्या भक्तमाला ग्रंथाचे प्रकाशन फैजपूर येथील २७ कुंडी महाविष्णू याग व गाथा पारायण नाम संकीर्तन सोहळ्यात उपस्थित संत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या तीन दिवसापासून शहरातील खंडोबावाडी देवस्थान मध्ये २७ कुंडी महाविष्णु याग व गाथा पारायण नामसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दिवसागणिक या महोत्सवामध्ये भाविकांची संख्या वाढत आहे. विष्णूयाग महोत्सवातून दररोज चाळीस यजमानांकडून होमहवन व पूजन करण्यात येत आहे, तर रात्री नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन होत आहे.
मंगळवारी रात्री महान संतांचे चरित्र संकलित केलेल्या 'भक्त माला' या ग्रंथाचे प्रकाशन प्रसाद महाराज, आमदार शिरीष चौधरी, मुक्ताई मंदिर संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, श्रीपती महाराज, महामंडलेश्वर जनार्दनहरी महाराज, ऋषिकेश महाराज, कन्हैया महाराज राजपूत, दुगार्दास महाराज, माधव महाराज राठी, रविंद्र महाराज हरणे, सुधाकर महाराज मेहून, नरेंद्र नारखेडे, विजय परदेशी, दीपक महाराज शेळगावकर, गोकुळ आबा पाटील चोपडा, शांताराम पाटील भुसावळ, भरत महाराज यांच्या हस्ते करण्यात आले
२९ रोजी रात्री वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे यांचे कीर्तन पार पडले.
महाविष्णू याग महोत्सवातील आजचे कार्यक्रम
३० रोजी रात्री अमृताश्रम स्वामी जोशी बाबा बीड यांचे कीर्तन होणार आहे. तत्पूर्वी सकाळी भव्य रक्तदान शिबिर दुपारी तीन वाजता कारगिल युद्धात सहभागी असलेले व विजय मिळवून देणारे सैनिक मेजर दीपक नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार समितीतर्फे होणार आह. रांगोळी व चित्रकला स्पर्धाही आयोजित केलेली आहे. यावेळी उपस्थितीचे आवाहन समितीचे अध्यक्ष चोलदास पाटील तसेच नरेंद्र नारखेडे व समितीने केले आहे.

Web Title: The character of the saints is inspiring for the younger generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.