दोषारोप ठेवण्याचे कामकाज आता ८ रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:16 AM2020-12-06T04:16:29+5:302020-12-06T04:16:29+5:30
बीएचआरमध्ये झालेल्या अपहार व फसवणूक प्रकरणात शिवराम चावदस चौधरी (७५,रा.शिव कॉलनी) यांच्या फिर्यादीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात कलम ४०९,४२०,१२० ...
बीएचआरमध्ये झालेल्या अपहार व फसवणूक प्रकरणात शिवराम चावदस चौधरी (७५,रा.शिव कॉलनी) यांच्या फिर्यादीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात कलम ४०९,४२०,१२० ब व महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम सन १९९१ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. यात संस्थेचे संस्थापक प्रमोद भाईचंद रायसोनी (५५,रा.बळीराम पेठ, जळगाव), दिलीप कांतीलाल चोरडीया (५१), सूरजमल भबुतमल जैन (५०),दादा रामचंद्र पाटील (६६), भागवत संपत माळी (६३), राजाराम काशिनाथ कोळी (४७), भगवान हिरामण वाघ (६०), यशवंत ओंकार जिरी (६०)शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार (५५),सुकलाल शहादू माळी (४५)ललीताबाई उर्फ लता राजू सोनवणे (३९) सर्व रा.तळेगाव, ता.जामनेर, मोतीलाल ओंकार जीरी (५०,रा.शेळगाव, ता.जामनेर), डॉ.हितेंद्र यशवंत महाजन (५२,रा.बेंडाळे नगर, प्रेम नगर, जळगाव) व इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (४०,रा.महाबळ, जळगाव) यांना २ फेब्रुवारी २०१५ रोजी अटक करण्यात आली आहे. प्रतिभा मोतीलाल जीरी (रा.शेळगाव, ता.जामनेर) या महिलेले फरार घोषीत करण्यात आलेले आहे. सर्व आरोपी जळगाव कारागृहात आहेत.