आणखी ७४ गुन्ह्यात होणार दोषारोपपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:43 AM2020-12-11T04:43:11+5:302020-12-11T04:43:11+5:30

सात खटल्याची सुनावणी करताना न्या.आर.एन.हिवसे यांनी कारागृहातून व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे हजर झालेल्या १४ संशयित आरोपींना तुमच्यावर कट रचणे, फसवणूक, अपहार व ...

Chargesheets will be filed in 74 more cases | आणखी ७४ गुन्ह्यात होणार दोषारोपपत्र दाखल

आणखी ७४ गुन्ह्यात होणार दोषारोपपत्र दाखल

Next

सात खटल्याची सुनावणी करताना न्या.आर.एन.हिवसे यांनी कारागृहातून व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे हजर झालेल्या १४ संशयित आरोपींना तुमच्यावर कट रचणे, फसवणूक, अपहार व एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हे दाखल असून त्या आधारावर दोषारोप ठेवण्यात येत असल्याचे सांगून, त्यावर तुमचे काय म्हणणे आहे. गुन्हा कबुल आहे का? अशी विचारणा केली. त्यावर सर्वच संचालकांनी आम्हाला गुन्हा नाकबुल असल्याचे सांगितले.

असे आहेत कलम व व्याख्या

कलम व्याख्या

१२० ब : कट रचणे

४२० : फसवणूक

४०६ : अपहार

४०८ : ( व्यवस्थापक असताना अपहार केला)

हे कलम फक्त सुखलाल माळी याला लागू आहे.

४०९ : जबाबदारी टाळून गुन्हेगारी कट

(हे कलम व्यवस्थापक वगळता सर्वांना लागू)

२०१ : पुरावा नष्ट करणे, कागदपत्रे गहाळ करणे

एमपीआयडी ३ : महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण तसेच ठेवींची व्याजासह परतफेड केली नाही

दृष्टीक्षेपात बीएआर

एकूण शाखा : २६४

एकूण गुन्हे : ८१

एकूण आरोपी : १५

अटकेतील आरोपी : १४

फरार आरोपी : ०१

एकूण गुन्ह्यात दोषारोप : १२

शिल्लक गुन्ह्यातील दोषारोप : ६९

आरोपींची सद्यस्थिती : कारागृहात

राज्यात या पोलीस ठाण्यात दाखल आहेत गुन्हे

जळगाव जिल्हा : रामानंद नगर, जळगाव शहर, एरंडोल, जामनेर, चोपडा शहर (२ गुन्हे) पाचोरा, भडगाव, चोपडा

परभणी : सेलू, नालनपेठ

अहमदनगर : कोपरगाव, श्रीगोंदा, राहुरी

धुळे : साक्री

वाशिम : वाशिम

औरंगाबाद : जवाहर नगर, कन्नड (२ गुन्हे),वैजापूर, शिळेगाव, सिडको

यवतमाळ : यवतमाळ

नागपूर : सीताबर्डी

नाशिक : सरकारवाडा, घोटी, येवला, चांदवड, निफाड, छावणी मालेगाव

वर्धा : वर्धा शहर, देवरी

अमरावती : खोलापुरी गेट, राजापेठ

अकोला : कोतवाली शहर, अकोला शहर

बीड : माजलगाव, परळी

सांगली : सांगली, इस्लामपूर

सोलापूर : माळशेज (४ गुन्हे), अकलुज

लातूर : लातूर शहर

बुलडाणा : देऊळगाव, धामणगाव बढे, खामगाव

नांदेड : शिवाजी नगर

सातारा : सातारा, फलटण

जालना : सदर बाजार

उस्मानाबाद : तेजापूर, उस्मानाबाद

पुणे : तळेगाव दाभाडे, जेजुरी, निगडी, हडपसर, सांगवी, शिक्रापूर, सिंहगड (२ गुन्हे), डेक्कन, को‌थरुड, पिंपरी, चिंचवड, विश्रनाथवाडी, भोसरी, वारजे मालवडी, खडकी, भारती विद्यापीठ, मार्केट यार्ड, आळंदी, मंचर, बारामती शहर, इंदापूर, भिगवान, नारायणगाव, खेड

Web Title: Chargesheets will be filed in 74 more cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.