गुन्हेगारांवर कारवाईसाठी चर्मकार समाजाचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 06:45 PM2019-01-01T18:45:50+5:302019-01-01T18:47:09+5:30
भीम क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना अटक करून नजरकैदेत ठेवणे याचा निषेध आणि आग्रा येथील पीडितेस जिवंत जाळणाºया गुंडांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी तालुका चर्मकार समाजातर्फे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : भीम क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना अटक करून नजरकैदेत ठेवणे याचा निषेध आणि आग्रा येथील पीडितेस जिवंत जाळणाºया गुंडांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी तालुका चर्मकार समाजातर्फे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भीमक्रांतीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद हे महाराष्ट्राच्या दौºयावर असताना कोणतेही कारण न देता त्यांना अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यामुळे करणी समाजावर अन्याय झाला आहे. राज्य शासनाच्या दडपशाहीचा तालुका चर्मकार संघातर्फे निषेध करण्यात येत आहे. तसेच आग्रा येथे इयत्ता दहावीत शिकणाºया बालिकेस जिवंत जाळून गुंड मोकाट फिरत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून लवकरात त्यांना शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी चर्मकार समाज तालुकाध्यक्ष धनंजय एदलाबादकर, प्रमोद रोजतकर, समाधान चीमकर, कैलास शिर्के तसेच समाजबांधव उपस्थित होते.