भुसावळ नगराध्यक्ष व मुख्याधिका:यांच्या प्रतिमेला चपलांचा हार

By admin | Published: May 5, 2017 01:06 PM2017-05-05T13:06:12+5:302017-05-05T13:06:12+5:30

अस्वच्छ भुसावळचा ठपका ठेवत जनआधार विकास पार्टीचे आंदोलन

Chasalera necklace in the image of the Chief President and Chief General of Bhusaval: | भुसावळ नगराध्यक्ष व मुख्याधिका:यांच्या प्रतिमेला चपलांचा हार

भुसावळ नगराध्यक्ष व मुख्याधिका:यांच्या प्रतिमेला चपलांचा हार

Next

 भुसावळ,दि.5- देशभरात अस्वच्छतेच्या बाबतीत भुसावळचा दुसरा क्रमांक आल्याने जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याला वंदन करून मुख्य चौकात नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी बी़टी़बाविस्कर यांच्या प्रतिमेला चपला-बुटांचा हार घालून निषेध व्यक्त केला़ अकार्यक्षम सत्ताधा:यांविषयी तसेच मुख्याधिकारी हटावची मागणी करण्यात आली़

भारत स्वच्छ अभियानांतर्गत देशभरातील 434 शहरांचा सर्वे करण्यात आला होता. त्यात अस्वच्छतेच्या बाबतीत देशभरात भुसावळचा दुसरा क्रमांक आल्याचे गुरुवारी नवी दिल्ली येथे जाहीर झाल्यानंतर भुसावळच्या सोशल मीडियात सत्ताधारी व नगरपालिका प्रशासनाविषयी शेलक्या शब्दात टीका करण्यात आली होती़ त्या पाश्र्वभूमीवर माजी आमदार संतोष चौधरी यांनी शुक्रवारी तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती दिली होती़
शुक्रवारी दुपारी 12़05 वाजता यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ जनआधारचे सर्व नगरसेवक तथा पदाधिकारी, कार्यकर्ते जमल़े   महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर यावल रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या पालिकेच्या वीज खांबावर मुख्याधिकारी बी़टी़बाविस्कर व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या प्रतिमा ठेवून त्यांना चपला-बुटांचा हार घालण्यात आला़ सत्ताधा:यांविषयी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली तसेच मुख्याधिकारी हटावची मागणी करण्यात आली़
आंदोलनात गटनेते उल्हास पगारे, माजी नगरसेवक जगन सोनवणे, अॅड़तुषार पाटील, दुर्गेश ठाकूर, नितीन धांडे, राहुल बोरसे, सचिन पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होत़े दरम्यान, आंदोलन झाल्यानंतर काही वेळाने शहर पोलीस दाखल झाल़े त्यांनी प्रतिमा ताब्यात घेतल्या़

Web Title: Chasalera necklace in the image of the Chief President and Chief General of Bhusaval:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.