जळगावात महिलेचा पाठलाग करणा-याचा पाठलाग करून झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:58 AM2018-01-11T11:58:58+5:302018-01-11T11:59:51+5:30

सततच्या त्रासामुळे बदलले होते पीडित महिलेने घर

Chasing of the woman in Jalgaon | जळगावात महिलेचा पाठलाग करणा-याचा पाठलाग करून झोडपले

जळगावात महिलेचा पाठलाग करणा-याचा पाठलाग करून झोडपले

Next
ठळक मुद्देगुन्हा दाखलअचानक नजरेस पडल्याने पाठलाग

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 11-  गेल्या सहा वर्षापासून त्रास देऊन महिलेचा पाठलाग करणा:या रफिक शेख मजीद (वय 40 रा. मन्यारवाडा, कोळी पेठ, जळगाव) याला बुधवारी दुपारी पाठलाग करतानाचा सापळा लावून रंगेहाथ पकडून झोडपण्यात आले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. श्रध्दा कॉलनीत हा प्रकार घडला. रफिक याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रफिक शेख मजीद याचे रथ चौकात इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. या दुकानाच्या कामासह प्लॉट खरेदी-विक्रीचेही काम करतो. पीडित महिला पूर्वी का.ऊ.कोल्हे शाळेच्या परिसरात वास्तव्याला होती. ही महिला मुलांना शिकवणीसाठी जायची तेव्हा रफिक हा त्यांचा पाठलाग करीत होता. 
सततच्या या प्रकारामुळे महिलेने तीन वर्षापूर्वी या परिसरातून घर बदलवून ते रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्याला आल्या होत्या. 
गुन्हा दाखल
रफीक याने केलेले कारनामे पीडित महिलेने व तिच्या पतीने पोलीस निरीक्षक रोहोम यांच्याकडे कथन केले. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रफिक याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला कलम 354 (ड) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ कोळंबे करीत आहेत. 
अचानक नजरेस पडल्याने पाठलाग
रफिक हा काही दिवसापूर्वी या परिसरात आला होता, तेव्हा ही महिला मुलांना शिकवणीसाठी सोडायला जात असताना त्याच्या नजरेस पडली. तेव्हा त्याने  न कळत घरार्पयत पाठलाग केला. नेमके घर कुठे आहे हे पाहिल्यानंतर मुलांना शिकवणीला सोडण्याची व परत घेण्याची वेळ माहिती झाल्यानंतर त्या-त्या वेळी तो महिलेचा पाठलाग करु लागला. हा प्रकार वाढल्याने महिलेने पतीला घटना सांगितली. त्यांनी मित्र व नातेवाईकांच्या मदतीने सतत तीन दिवस सापळा लावला. बुधवारी श्रध्दा कॉलनी परिसरात महिलेच्या दुचाकीच्या शेजारी दुचाकी आणून अश्लिल हावभाव करताना आढळताच लोकांनी त्याला अडवून रस्त्यावरच झोडपले.
पळून जाण्याचा प्रय} फसला
आपले बिंग फुटल्याची जाणीव होताच रफिकने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. त्याला पकडून ठेवत रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीसही अवघ्या दहा मिनिटात घटनास्थळावर पोहचले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी त्याची चौकशी केली तर पीडित महिलेने आपबिती कथन केली. दरम्यान, रफिक याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रोहोम यांनी दिली.
दरम्यान, त्याच्या या कारनाम्यांची माहिती पीडित महिलेने दोन दिवसापूर्वीच रामानंद नगर पोलिसांना दिली होती. दरम्यान, पीडित महिलेचा पती स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरीला आहे. 

Web Title: Chasing of the woman in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.