पाटणादेवी येथे चैत्रपौर्णिमा यात्रोत्सव
By Admin | Published: April 11, 2017 03:50 PM2017-04-11T15:50:39+5:302017-04-11T15:50:39+5:30
पाटणादेवी येथे चंडिका देवी यात्रोत्सवास मंगळवारपासून सुरुवात झाली असून यानिमित्ताने 11 रोजी रथ मिरवणूक निघाली.
चाळीसगाव,दि.11- दरवर्षाप्रमाणे यंदाही पाटणादेवी येथे चंडिका देवी यात्रोत्सवास मंगळवारपासून सुरुवात झाली असून यानिमित्ताने 11 रोजी रथ मिरवणूक निघाली.
पाटणादेवी यात्रोत्सवात 13 रोजी कुस्त्यांची दंगल होणार आहे. भाविकांसाठी पाटणादेवी प्रतिष्ठानतर्फे रांगेत दर्शन, पिण्याचे पाणी, पूजा, अभिषेक आदीची व्यवस्था केली आहे. तर परिवहन महामंडळातर्फे चाळीसगाव येथून जादा बसेस सोडण्यात आल्या आहे. तीन दिवस यात्रोत्सव असून पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठ गर्दी केली होती.
निर्धारीत वेळेतच दर्शन
पाटणादेवी वन परिसरात वन्य प्राण्यांचा संचार असून उन्हाळी वातावरणामुळे प्राणी सायंकाळी बाहेर पडत असल्यामुळे भाविकांसाठी दर्शनाची वेळ ही सकाळी 8 ते सायंकाळी 6 र्पयत निश्चित केली आहे. सायंकाळी 6 ते सकाळी 8 या वेळेत या परिसरात कुणालाही प्रवेश देण्यात येणार नसल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम.राठोड यांनी यावेळी सांगितले.