तोतया तृतीयपंथीयांना दिला जोरदार चोप
By admin | Published: July 6, 2017 01:18 AM2017-07-06T01:18:43+5:302017-07-06T01:18:43+5:30
मुक्ताईनगर : खºया तृतीयपंथीयांचा रुद्रावतार
मुक्ताईनगर : तृतीयपंथीचे रूप धारण करून वाहन चालकांना अडवीत पैशाची मागणी करणाºया दोन तरुणांना परप्रांतीय खºया तृतीयपंथीयांनी बेदम चोप देऊन त्यांचे टक्कल केले.
येथेच न थांबता बघ्यांच्या गर्दी समोर दोघा तरुणांना विवस्त्र करून अद्दल घडविल्याची घटना मुंबई-नागपूर महामार्गावर बºहाणपूर चौफुलीवर घडली. खोट्या तृतीयपंथीयांना खºया तृतीयपंथीयांनी बदडल्याचा हा प्रकार धक्कादायक होता.
दोघे बहुरूपी तरुण मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथील आहे. मध्य प्रदेशातून मूर्तिजापूरकडे चारचाकीने जाणाºया चार तृतीयपंथीयांनी केळी घेण्यास बºहाणपूर चौफुल्लीवर वाहन थांबविले असता. साडी-चोळी घालून तृतीयपंथीयांचे रूप घातलेले दोन तरुण येथून जाणाºया ट्रक चालकांना थांबून त्यांच्याकडून पैशांची मागणी करीत असल्याचे त्यांना दिसले. हे पाहताच संतप्त झालेल्या खºया तृतीयपंथीयांनी या दोघांवर हल्ला चढविला.
‘अरे तुम मर्द के नाम पर कलंक हो, दारू पीकर हमे बदनाम करते हो’ असे ओरडत या बहुरूपी तरुणांना बदडणे सुरू केले. शेजारच्या सलूनवरून कात्री आणून दोघांचे टक्कल केले इतक्यावरच न थांबता बघ्यांच्या गर्दीसमोर दोघा तरुणांना निर्वस्त्र केले. स्वत:च्या पंथाच्या सन्मानार्थ रहदारीच्या या महामार्गावर तृतीयपंथीयांचा हा रुद्रावतार धक्कादायक होता.