चातुर्मास आत्मशुध्दीसाठी महत्वाचा काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:15 PM2020-07-06T23:15:36+5:302020-07-06T23:15:56+5:30

चातुर्मास हा एक असा शब्द आहे की, जो प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या अंतरंगात विशेष आनंदाची अनुभुती एक विशेष प्रसन्नतेची अनुभुती ...

Chaturmas is an important time for self | चातुर्मास आत्मशुध्दीसाठी महत्वाचा काळ

चातुर्मास आत्मशुध्दीसाठी महत्वाचा काळ

Next

चातुर्मास हा एक असा शब्द आहे की, जो प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या अंतरंगात विशेष आनंदाची अनुभुती एक विशेष प्रसन्नतेची अनुभुती देऊन जातो. चातुर्मास हा एक संस्कार आहे. ज्याच्या माध्यमातून आपले शतकानुशतके चालत आलेल्या अनेक चांगल्या गोष्टींचे पुन्हा एकदा अवलोक, पुन्हा एकदा मूल्यमापन आणि पुन्हा आपल्या जीवनात त्या सर्व मूल्यांचे असलेले स्थान हे पाहण्याची संधी या चातुर्मासच्या निमित्ताने मिळत असते. यंदाचा चातुर्मास हा अधिक मास असल्यामुळे पाच महिन्यांचा आहे. या ५ महिन्यांच्या कालावधीत आपण जास्तीत जास्त आपल्या संस्कृती, परंपरा, मूल्यांचे जतन करूया. बऱ्याच ठिकाणी साधू संतांचे आपल्या नियोजित ठिकाणी येणे झाले. बºयाच साधू संतांचे चातुर्मास कोरोनामुळे बदलावे लागले.
सर्वच धार्मिक वर्गासाठी हा एक कसोटीचा काळ आहे. मुलांना जेस शाहेतून घरी आल्यानंतर होमवर्क किंवा स्वयंअध्ययन, वाचन करणे हे खूप महत्वाचे असते, त्याचप्रमाणे यावर्षीचा चातुर्मास सर्वांसाठीच होमवर्क व स्वयंअध्ययनाचा आहे. आपण या कालावधीत काय, काय करायला पाहिजे? हे आता स्वत:च ठरवून घ्यायचे आहे. चातुर्मासमधले पहिले कर्तव्य ‘जयणा’ म्हणजे यतना. जीवदया किंवा विवेकपूर्व आचरण असे म्हटले पाहिजे. ‘जयणा धम्मस्स जननी’ धर्माचा उगमच जीवदयेतून आणि विवेकातून होत असतो. चातुर्मासमध्ये जिवोत्पत्ती जास्त प्रमाणात होत असते. यासाठी आपल्याला चालताना वा बाकीचे सगळे व्यवहार करताना जितकी जास्तीत जास्त जीवरक्षा घडू शकते, त्यासाठी जागृत राहणे महत्वाचे आहे. पावसाळ्यात लहान लहान किड्यांपासून तर अनेक प्रकारचे जीवजंतू जमीन, वातावरणात फिरत असतात. आजच्या कोरोनासारख्या स्थितीत जर हा मुद्दा विवेक विशेष महत्वाचा आहे. आपण स्वत: सुरक्षित राहून बाकीच्या जीवांनासुध्दा आपल्यामुळे त्रास होणार नाही, यासाठी जागृत राहणे गरजेचे आहे. जसे वर्षाऋतुमध्ये वातावरण आर्द्र असते, आपल्या मनालासुध्दा करूणेनं आर्द्र बनवण्याची प्रेरणा घेऊन हा चातुर्मास काळ आलेला आहे.
- श्रमणसंघीय युवाचार्य प्रवर प.पू. महेंद्रऋषीजी महाराज

Web Title: Chaturmas is an important time for self

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव