जळगावात संडे मार्केटमध्ये स्वस्तात मस्त ‘फॅशनेबल’ कपडे व पादत्राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:41 PM2018-02-04T23:41:30+5:302018-02-04T23:45:27+5:30

ग्राहकांची खरेदीसाठी दर रविवारी गर्दी

Cheap clothes and footwear in luxury market in Jalgaon | जळगावात संडे मार्केटमध्ये स्वस्तात मस्त ‘फॅशनेबल’ कपडे व पादत्राणे

जळगावात संडे मार्केटमध्ये स्वस्तात मस्त ‘फॅशनेबल’ कपडे व पादत्राणे

Next
ठळक मुद्दे बेरोजगारांना मिळाला रोजगारमुंबई, दिल्ली येथून येतो माल

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 4 - दिवसेंदिवस कपडे, चपला, बुट यांचे दर वाढत असतानाही कमी किंमतीत नवीन ट्रेण्डच्या कपडय़ांची हौस भागविण्याची संधी जळगावात सुरु झालेल्या ‘संडे मार्केट’ने उपलब्ध करून दिली आहे. ‘रस्ते का माल सस्ते मे’ याप्रमाणे एकाहून एक सरस कपडे, चपला, बुट घेण्यासाठी रविवारी सकाळपासून शहरातील नेहरु चौकात प्रचंड गर्दी होत असून ब्रॅण्डेडच्या तोडीचा माल येथे सहज उपलब्ध होत असल्याचे तरुणाईचा खरेदीसाठी कल वाढत आहे.  या बाजाराने बेरोजगार तरुणांना रोजगारही उपलब्ध करून दिल्याने त्यांनाही दिलासा मिळाला आहे. 
कपडे व पादत्राण्यांचा नवनवीन ट्रेण्ड बाजारात येतो व त्याचे तरुणाईला खास आकर्षण असते. मात्र याचे दर गगणाला भिडत आहे. असे असतानाही तरुणाईला जळगावातील या संडे मार्केटने नवनवीन ट्रेण्डची  हौस पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 

रविवारची असते प्रतीक्षा
मुंबई, पुणे, नागपूर व इतर शहरात ठराविक भागामध्ये स्वस्त कपडय़ांचा बाजार भरतो. त्याच धरतीवर गेल्या सहा महिन्यांपूर्वी जळगावातही अशा प्रकारच्या बाजाराला सुरुवात झाली आहे. दर रविवारी सकाळी साधारण नऊ वाजेपासून नेहरू चौकात हे दुकाने लागण्यास सुरुवात होते. रविवारी या भागातील दुकाने बंद असतात. त्या दुकानांसमोर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही, याची दक्षता घेत ही दुकान थाटली जातात. सहा महिन्यांपासून याची बहुतांश जणांना माहिती झाल्याने आता प्रत्येकास रविवारच्या या बाजाराची प्रतीक्षा लागलेली असते. 

दीडशे रुपयांपासून करा फॅशन
जीन्स पॅण्ट, साधी पॅण्ट, शर्ट, टी शर्ट यासह कपडय़ांचे विविध प्रकार वेगवेगळ्य़ा आकार, रंगात तसेच  चपला, बुटा, कबरेचा पट्टा (बेल्ट), पाकीट (व्हॉलेट) अशा एकाहून एक फॅशनेबल वस्तू येथे उपलब्ध असतात. दीडशे रुपयांपासून ते चारशे रुपयांमध्ये येथे कोणतीही वस्तू सहज उपलब्ध होत असल्याने कमी किंमतीत नवनवीन फॅशनची हौस येथून भागविली जात आहे.

दालनांच्या तोडीच्या वस्तू
सध्या चांगल्या प्रकारातील  जीन्स, शर्ट घ्यायला गेले तरी ते साधारण दोन हजार रुपयांच्या पुढेच जातात. तसेच पादत्राणे घ्यायचे म्हटले तरी ते 400 ते 800 रुपयांर्पयत असतात. मात्र या ठिकाणी त्याच तोडीचे ड्रेस 300 ते 800 रुपयांमध्ये तर चपला- बुट 150 ते 300 रुपयांमध्ये सहज उपलब्ध होतात. 

मुंबई, दिल्ली येथून येतो माल
जळगावात कमी किंमतीत मिळणारे कपडे व या वस्तू मुंबई, दिल्ली येथून आणल्या जातात. यासाठी तेथील व्यापा:यांवर अवलंबून न राहता हे विक्रेते तेथे स्वत: जावून निवडून चांगल्या प्रकारचा माल जळगावात आणतात. हल्ली एकाच पॅकिंगमध्ये तीन ते चार शर्ट वेगवेगळ्य़ा डिजाईन व आकारात उपलब्ध झालेले आहे, त्याच प्रकारचे कपडे येथेही उपलब्ध असल्याने तरुणाईचा इकडे खरेदीसाठी मोठा कल दिसून येतो. 

शहरा बाहेरील ग्राहकांचीही गर्दी
ज्या ठिकाणी हा बाजार भरतो, ते ठिकाण रेल्वे स्थानकाकडून येताना अगदी समोर असल्याने बाहेर गावाहून येणा:यांसाठीही ते सोयीचे आहे. त्यामुळे समोर हा बाजार दिसताच तेथे खरेदीसाठी या मंडळींचे पाय आपसूकच वळतात. 

इंटरनेटवरून घेतली जाते माहिती
या ठिकाणी माल आणण्यासाठी येथील विक्रेते तंत्रज्ञानाचा वापर करीत चांगला व नवनवीन फॅशन असलेला माल आणण्यासाठी तत्पर असतात. त्यासाठी नवीन फॅशन कोणती, तो माल कोठे उपलब्ध आहे, याची  इंटरनेटवरून माहिती घेत असतात व ज्या फॅशनची ‘चलती’ आहे, तो माल येथे आणून जळगावकरांची हौस पूर्ण करीत आहे. 

तरुण वळले स्वयंरोजगाराकडे
शिक्षण घेऊनही रोजगार मिळत नसल्याने येथील काही तरुणांनी या बाजाराविषयी माहिती घेत या क्षेत्रात वळले असून यातून त्यांनी स्वयंरोजगार उभा केल्याचा आनंद असल्याचे येथील विक्रेत्यांनी सांगितले. 

Web Title: Cheap clothes and footwear in luxury market in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.