सतीश पाटील यांनी बनवलेले स्वस्तात मस्त हवा निर्जंतुक यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:15 AM2021-05-08T04:15:58+5:302021-05-08T04:15:58+5:30
जळगाव : सध्याच्या काळात हवा शुद्ध असणे गरजेचे झाले आहे. सध्या हवेमध्ये वेगवेगळे विषाणु, जीवाणु, धुळ मोठ्या प्रमाणात असते. ...
जळगाव : सध्याच्या काळात हवा शुद्ध असणे गरजेचे झाले आहे. सध्या हवेमध्ये वेगवेगळे विषाणु, जीवाणु, धुळ मोठ्या प्रमाणात असते. त्यात हवा शुद्ध करण्याचे यंत्र बाजारात चढ्या किंमतीने विकले जात आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक सतीश पाटील यांनी स्वस्तात मस्त असे हवा निर्जंतुक करण्याचे यंत्र बनवले आहे.
सतीश पाटील यांनी एक मोठा ड्रम घेतला. त्यात साबण आणि पाणी घातले. त्याला एक लहान आकाराचा एक्सॉस्ट फॅन बसविला त्यामुळे हवा त्या ड्रममध्ये जाऊ शकेल आणि मग त्या ड्रमच्या झाकणला वरच्या बाजुने एक पाईप लावला आहे. त्यातून शुद्ध हवा पुन्हा बाहेर येऊ शकेल. त्या पंख्यातून वेगाने हवा आतमध्ये जाते. त्यातील धुलिकण, विषाणु आणि जिवाणु त्या पाण्यावर आदळतात. त्यामुळे जिवाणु आणि विषाणुचा नाश होतो. आणि धुळ पाण्यातच अडकते. आणि दुसऱ्या बाजुने पुन्हा शुद्ध हवा बाहेर येते. एका लहान खोलीतील हवा शुद्ध करण्यासाठी फक्त १५ ते २० मिनिटांचा वेळ लागतो. मोठे कार्यालय असेल तर हे यंत्र जास्त वेळ सुरू ठेवावे लागते. त्याचा पाईप फक्त उंच असला पाहिजे. अन्यथा हवा तेथेच फिरत राहील.
कोट - सध्या सर्वानाच शुद्ध हवेची गरज भासत आहे. त्यामुळे अत्यंत कमी खर्चात हे यंत्र बनवले जाते. याचा वापर सर्वांनी करावा. त्यात जुन्या बादल्या व संगणकाच्या लहान एक्झाॅस्ट फॅनचा देखील उपयोग केला जाऊ शकते. सध्याच्या काळात सर्वांनाच त्याची आवश्यकता आहे.
- सतीश पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक.