घटनास्थळावरून संवाद झालेले कॉल तपासणार
By admin | Published: January 6, 2017 12:56 AM2017-01-06T00:56:17+5:302017-01-06T00:56:17+5:30
अमळनेर : गुजरातला गेलेल्या पथकाच्या हाती निराशा
अमळनेर : पन्नास लाखांच्या खंडणीसाठी पार्थ बहुगुणे याचे अपहरण करणा:यांनी ज्या ठिकाणाहून संवाद साधले, त्याच परिसरातून सुमारे 250 मोबाइल नंबरवरून झालेल्या अन्य कॉल्सचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी सांगितले.
डॉ. निखिल बहुगुणे यांचा मुलगा पार्थ (12) याचे मंगळवारी रात्री चौघांनी अपहरण केले होते. मध्यरात्री त्याची सुटका केली होती. या घटनेचा पोलीस यंत्रणा तपास करीत आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी पारोळा येथील गुन्हेगाराच्या चौकशीसाठी गुरुवारी तेथे काही ठिकाणी झाडाझडती घेतली. तसेच अपहरणकत्र्यानी खंडणी मागण्यासाठी ज्या-ज्या ठिकाणाहून कॉल केले होते, त्याच ठिकाणाहून सुमारे 250 लोकांनी मोबाइलवरून संवाद साधले आहेत. त्या सर्व नंबरचे सीडीआर काढण्यात येऊन चौकशी करण्यात येणार आहे
भ्रमणध्वनी सापडला
ढेकू रोडला एक मोबाइल सापडला आहे. त्याचेही सीडीआर काढून ओळख पटविण्यात येणार आहे. येत्या दोन-तीन दिवसात स्थानिक गुन्हा शाखा अन्वेषण विभाग आरोपींना ताब्यात घेणार असल्याचा दावाही केला आहे.
तो क्रमांक बडोद्याचा
अपहरणकत्र्यानी ज्या क्रमांकावरून (7434070534, 9537270412 कॉल केला होता, तो बडोदा येथील नीरज अफेटकर याच्या नावावर असल्याचे समजताच, अमळनेर पोलिसांचे पथक बडोद्याला रवाना झाले होते. मात्र त्या माणसाचे कागदपत्रे चोरून गुन्हेगारांनी सीम घेतले असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. दरम्यान, अमळनेर व पारोळा येथील सराईत गुन्हेगारांचे जेलमधील वर्तन व गुजरातचे वास्तव्य, व्यवसाय, त्याच्यासोबत शिक्षा भोगलेले गुन्हेगार आदींची चौकशी करण्यात येणार असल्याचे विकास वाघ यांनी सांगितले.
(वार्ताहर)