प्रत्येकाची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:17 AM2021-04-23T04:17:35+5:302021-04-23T04:17:35+5:30
भाेजनासाठी गर्दी जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या शिवभोजन केंद्रावर गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गर्दी झालेली होती. या ठिकाणी ...
भाेजनासाठी गर्दी
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या शिवभोजन केंद्रावर गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गर्दी झालेली होती. या ठिकाणी मोफत भोजन मिळत असून शासनाकडून तशी घोषणा करण्यात आली आहे. या ठिकाणी गरजू नागरिकांची मोठी रांग लागलेली होती. लॉकडाऊनच्या स्थितीत कुणावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रस्त्याकडे दुर्लक्षच
जळगाव : अयोध्यानगरातील रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्षच असल्याने वाहनधारकांना या रस्त्यावरून कसरत करीतच वाहने चालवावी लागत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ही समस्या कायम असून पावसानंतर तर या रस्त्यांवर अंत्यत बिकट अवस्था होत आहे. रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.
वानरांचा मुक्त संचार
जळगाव : उष्णतेचे प्रमाण वाढत असून यामुळे पाण्यासाठी वन्यजीवांची भटकंती होत असल्याचे चित्र आहे. अशाच प्रकारे वानरांच्या टोळ्याच्या टोळ्या शहरात अनेक परिसरच नव्हे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही मुक्त संचार करीत आहे. पाणी व अन्नाच्या शोधार्थ शहराकडे हे जीव वळले आहेत.