शाळांमध्ये क्रांतीचा जयजयकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 01:28 PM2019-08-10T13:28:41+5:302019-08-10T13:29:39+5:30
विविध उपक्रम : क्रांतीवीरांना ंआदरांजली,
जळगाव : क्रांतीदिन शुक्रवारी विविध शाळांमध्ये उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी क्रांतीवीरांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच क्रांतिकारकांच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला.
प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय
मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात क्रांतिदिन साजरा करण्यात आला. शिक्षिका रूपाली वानखेडे या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहिद झालेल्या हुतात्म्यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली.
सूत्रसंचालन सानिया कुशवाह हिने तसेच आभार प्रदर्शन श्रृष्टी जयस्वाल हिने केले. विद्यार्थी भाषणामध्ये संदेश तिवारी, सानिया शाह, प्रशांत कवळे, काजल राठोड, निकिता शिरसाठ, नंदिनी चव्हाण, रजनी तायडे, आशिष राठोड, प्रणाली गायकवाड, तब्सुम पटेल, अस्मिता चव्हाण यांनी सहभाग नोंदविला. यशस्वीतेसाठी गजानन सूर्यवंश्ी, अविनाश महाजन, मोहिनी चौधरी, धनश्री फिरके, लिना नारखेडे, तुषार नारखेडे तसेच दिपक भोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
रावसाहेब रुपचंद विद्यालय
आर. आर. विद्यालयात क्रांती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक विजय रोकडे, प्रभावती बावस्कर, प्रमुख वक्ता चारूलता पाटील उपस्थित होते. विजय रोकडे यांनीदेखील क्रांतीकारकांच्या आठवणी सांगितल्या. सूत्रसंचालन तुषार पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार डी. बी. पांढरे यांनी
मानले.
चांदसरकर प्राथमिक विद्यामंदिर
खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै. गिरीजाबाई नथ्थूशेठ चांदसरकर प्राथमिक विद्यामंदिर, साने गुरूजी कॉलनी या शाळेत सुरूवातीला सर्वप्रथम देशातील ज्या महान व्यक्तींनी बलिदान दिले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक श्याम ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीदिनाची माहिती सांगितली. शाळेतील उपशिक्षिका जयश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले व जयश्री मेने यांनी आभार मानले.
या कार्यक्रमात शाळेतील सर्व २० विद्यार्थ्यांनी भाषणे केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना बाविस्कर, शारदा चौधरी, अनिता वाघमारे, पुनम पाटील, जयश्री खडके, स्वप्निल भोकरे, अमोल सोनकुळ, महेश तायडे, विवेक कोठावदे, भूषण अमृतकर यांनी परिश्रम घेतले.
सिद्धीविनायक विद्यालय
जुन्या औद्योगिक वसाहतमधील सिद्धीविनायक प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुरुवातीला सरला वाडीले यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेविका लता सोनवणे, पालक-शिक्षक संघाच्या कविता तायडे, मुख्याध्यापक आर. पी. खोडपे, गुलाबराव पाटील हे उपस्थित होते. विद्यालयातील हर्षल भामंदे, पवन गव्हाणे, टिनू राणे, तेजस मुजाल्दे, सोनल पाटील, काजल डांगे व देवयानी शिंदे या विद्यार्थ्यांनी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू, चंद्रशेखर आझाद, वासुदेव फडके, नाना पाटील या क्रांतिकारकांची माहिती उपस्थितांना देऊन त्यांच्या महान कार्याची ओळख करून दिली. विद्यालयातील उपशिक्षक सुनील डांगरे, अनिल पावरा या शिक्षकांनी क्रांतिदिनाचे महत्व विषद केले. सूत्रसंचालन आर. एस. पाटील व आभार मुख्याध्यापक आर. पी. खोडपे यांनी मानले.
प. वि. पाटील विद्यालय
गुरुवर्य प. वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्याहस्ते महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आदी क्रांतिकारकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
ज्याप्रमाणे क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशासाठी बलिदान दिले त्याप्रमाणे आपणसुद्धा देशाच्या विकासासाठी आपल्यापरीने मदत केली पाहिजे, असे मत शिक्षक योगेश भालेराव यांनी व्यक्त केले.
एस. ए. बाहेती महाविद्यालय
अॅड. एस. ए. बाहेती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्टÑीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग व एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीदिन, जागतिक आदिवासी दिवस व महाविद्यालयाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी अनेक जणांनी मनोगत व्यक्त केले.
प्रगती विद्यामंदिरात वक्तृत्व स्पर्धा
क्रांतीदिनाचे औचित्य साधून प्रगती विद्यामंदिर येथे ‘क्रांतिकारकांचे जीवन’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. परिक्षण सुवर्णा पाटील व भाग्यश्री तळेले यांनी केले. नियोजन मनोज भालेराव व संध्या अट्रावलकर, पंकज नन्नवरे, रमेश ससाणे यांनी केले. सूत्रसंचालन विजया पाटील व आभार मनोज भालेराव यांनी मानले. याप्रसंगी मुख्याध्यापिका शोभा फेगडे, मुख्याध्यापिका मनिषा पाटील, अलका करणकर, अविदीप पवार, स्नेहल उदार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.