मोरया ग्लोबल कंपनीतील केमिकलला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:14 AM2021-04-26T04:14:24+5:302021-04-26T04:14:24+5:30

जळगाव : एमआयडीसीतील डब्ल्यू सेक्टरमध्ये असलेल्या मोरया ग्लोबल या केमिकल बनविणाऱ्या कंपनीत रविवारी सकाळी दहा वाजता अचानकपणे केमिकलला ...

Chemical fire at Morea Global Company | मोरया ग्लोबल कंपनीतील केमिकलला आग

मोरया ग्लोबल कंपनीतील केमिकलला आग

Next

जळगाव : एमआयडीसीतील डब्ल्यू सेक्टरमध्ये असलेल्या मोरया ग्लोबल या केमिकल बनविणाऱ्या कंपनीत रविवारी सकाळी दहा वाजता अचानकपणे केमिकलला आग लागली. अग्निशमन बंब वेळीच दाखल झाला. या कर्मचाऱ्यांनी केमिकल फोमचा मारा करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे दुर्घटना टळली. आगीत किरकोळ नुकसान झाले आहे.

या कंपनीत नियमित काम सुरू असताना सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी मशीनमध्ये असलेल्या केमिकलला अचानकपणे आग लागली. कंपनीचे मालक अरुण निंबाळकर यांनी अग्निशमन विभागाला घटना कळविली. अग्निशमन विभागाचे शशिकांत बारी, साहाय्यक अग्निशमन अधिकारी सुनील मोरे, चालक देवीदास सुरवाडे, हेड फायरमन रोहिदास चौधरी, साहाय्यक फायरमन भगवान पाटील, हिरामण बावस्कर, संजय भोईटे, सरदार पाटील, जगदीश साळुंखे या कर्मचाऱ्यांनी केमिकल फोमचा मारा करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे अनर्थ टळला. एमआयडीसी पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. मात्र कंपनीचे मालक अरुण निंबाळकर यांनी किरकोळ नुकसान झाले असून कुठलीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले.

Web Title: Chemical fire at Morea Global Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.