छगन भुजबळांच्या वेदनेवर शेरोशायरीची फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 09:26 PM2018-09-16T21:26:22+5:302018-09-16T21:34:11+5:30

महाराष्ट्र सदनप्रकरणी छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर आपल्याला मोडण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झाल्याचे त्यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal on the pain | छगन भुजबळांच्या वेदनेवर शेरोशायरीची फुंकर

छगन भुजबळांच्या वेदनेवर शेरोशायरीची फुंकर

googlenewsNext
ठळक मुद्देभडगावात झाला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावाशेरोशायरीमुळे आली मेळाव्यात रंगतमाजी कृषीमंत्री शरद पवारांसह अनेकांनी दिली दाद

जळगाव : दिल्ली येथील महाराष्ट्र सदन घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अटक होऊन काही वर्षे कारागृहात रहावे लागले. आपल्याला तोडण्याचा झालेला प्रयत्न त्यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून सभेत मांडला. त्यातच उपस्थितांमधून भुजबळ यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित शेरोशायरी आल्याने सभेत रंगत आली.
महाराष्ट्र सदनप्रकरणी छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर आपल्याला मोडण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झाल्याचे त्यांनी सांगितले.
किस्ती तो उनकी डुबती
जिनके इमान डगमगाते है
जिनके दिल मे नेकी है
उनके सामने मंजिले भी सर झुकाती है

भुजबळ यांच्या या शेरवर समोर उपस्थित असलेल्या सी.एन.चौधरी यांनी एक शेर सादर केला.
चाहे कोई लाख कोशिश करे मुझे बदनाम करने की
मैं जब भी बिखरा हूँ, दुगनी गती से निखरा हूँ.

समोरून प्रतिसाद आल्यानंतर भुजबळ यांनीदेखील आणखी एक शेर ऐकविला.
चलने की कोशिश तो करो दिशाए बहोत है
रास्तो पे बिखरे काँटो से ना डरो
तुम्हारे साथ लाखो दुवाँए है.

भुजबळ यांचा प्रतिसाद पाहून समोर उपस्थित असलेल्या सी.एन. चौधरी यांनी पुन्हा एक शेर ऐकविला.
हजारो मुश्किले आऐ तो भी, शरीफो की शराफत कम नही होती.
करलो सोने के सौ तुकडे, उसकी किंमत कम नही होती।

दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या शेरोशायरीमुळे खुद्द खासदार शरद पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व व्यासपीठावरील मान्यवरांनी दाद देण्यास सुरुवात केली. त्यामुळे भुजबळांनीदेखील पुन्हा एक शेर सादर केला.
लोग जो दौड मे तुमको हरा सकते नही
वो तुम्हे तोडकर हराने की कोशीश कर रहे है.

उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा प्रतिसाद पाहता पुन्हा एक शेर त्यांनी सादर केला.
लाख दलदल हो पर पैर जमाएॅ रखो
हाथ खाली सही, हाथ उपर उठाए रखो
कौन कहता है छलनी मे पाणी नही रुखता
बर्फ बनने तक हौसला बनाऐ रखो.

छगन भुजबळ यांच्या या शेरोशायरीमुळे कार्यकर्ता मेळाव्यात रंगत आली असताना आगामी काळातील निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचा संदेश देण्यात आला.

Web Title: Chhagan Bhujbal on the pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.